निकलाआधीच माझा पराभव निश्चित आहे म्हणणारा राज्यातील एकमेव उमेदवार!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी काल महाराष्ट्रात मतदान पार पडलं. आता सर्वाना २४ तारखेची प्रतीक्षा लागली आहे. २४ तारखेला महाराष्ट्रात निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागू झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. प्रचार सभांमधून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. देशपातळीवरच्या नेत्यांनी महाराष्ट्रात हजेरी लावली. निवडणुकीच्या चर्चा अगदी गावच्या पारांवर रंगल्या.

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेले पक्षांतर, दिग्गजांच्या तिकिटाला कात्री, शरद पवारांना ED नोटीस आणि अजितदादांचा राजीनामा, शिवसेनेचे दहा रुपयात तर भाजपचे पाच रुपयात पोटभर जेवण देण्याचे आश्वासन, तेल लावलेला पैलवान, साताऱ्यात पाऊस आणि पवार याशिवाय मुंडे बहीण भावात झालेले राजकीय नाट्य हे मुद्दे चांगलेच गाजले.

या सर्व मुद्यामध्ये ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा मुद्दा देखील महत्वाचा होता. आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून निवडणूक लढवली. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. सुरेश माने यांनी निवडणूक लढवली. तर वंचित बहुजन आघाडीकडून निवृत्त पोलीस अधिकारी गौतम गायकवाड हे मैदानात होते.

विशेष म्हणजे या उमेदवारांच्या व्यतिरिक्त बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही वरळीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं होतं. आदित्य ठाकरे लाखोंच्या मताधिक्याने वरळीतून निवडून येतील असा विश्वासही शिवसेना नेते व्यक्त करत आहे. निकालाला अवघा एक दिवस उरला आहे.

मात्र निकालाच्या आधीच आदित्य यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने आपला पराभव निश्चित असल्याचे सांगितले आहे. एरव्ही सर्व उमेदवार आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करत असतात. मात्र या उमेदवाराने अगोदरच आपला पराभव होणार असे सांगितले आहे.

वरळीतील हा उमेदवार म्हणतो माझा पराभव निश्चित-

वरळी मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याचे कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य यांच्या समोर सुरेश माने यांच्या रूपाने आव्हान उभा करण्यात आले. त्यात किती यश आले हे २४ तारखेला कळेलच.

याशिवाय मराठी बिग बॉसचे स्पर्धक अभिजित बिचकुलेने निवडणूक लढवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वी देखील झाला. आपला विजय निश्चित असल्याचे सांगणाऱ्या अभिजीत बिचुकलेने आता मात्र आपला पराभव होणार असल्याचे सांगितले आहे.

ठाकरे कुटुंबियांची संपत्ती आणि ताकद यामुळे माझा पराभव निश्चित आहे. मात्र मला पराभूत करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांना पैशाची ताकद लावावी लागली. एकीकड ठाकरे कुटुंबियांवर टीक करताना निवडणुकीदरम्यान ठाकरे कुटुंबियांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, असंही अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *