या ३ निवडणुकांमध्ये चुकले होते एक्झिट पोलचे अंदाज

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. २४ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. परंतु वेगवेगळ्या सर्व्हे आणि माध्यमांमधून निवडणुकांचे एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात झाली आहे.

सर्व सर्व्हे आणि पोलमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आणि महायुतीला परत एकदा बहुमत मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. विरोधकांनी राज्यात परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. यापूर्वीही काही निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते. पाहूया त्यापैकी काही निवडणुकीच्या निकालाबाबत…

१) २००४ ची लोकसभा निवडणूक :

अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार २००४ मध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना “इंडिया शायनिंग” या कॅम्पेनिंगसह निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. “अगली बारी अटलबिहारी” म्हणत भाजपने जोरदार प्रचार केला होता.

भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही दलाला ५४३ जागांपैकी जवळपास २३०-२७५ जागा मिळतील असे अंदाज Exit Poll मध्ये वर्तवण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालाचे आकडे समोर आल्यानंतर भाजपला केवळ १८५ तर काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला २१८ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी सप, बसप, डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेस सरकार स्थापन झाले होते.

२) २०१५ ची बिहार निवडणूक :

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा करिश्मा असणाऱ्या वातावरणात बिहार विधानसभेच्या निवडणूक होत होत्या. नितीश कुमार, लालूप्रसाद यादव आणि राहुल गांची यांच्या पक्षांनी आघाडी केली होती. भाजप मोदींचा चेहरा वापरुन निवडणूक लढवत होती तर आघाडीकडे असा चेहरा नव्हता. Exit Poll मध्ये भाजपला १००-१२७ जागांवर बहुमत मिळेल असे सांगण्यात आले होते, परंतु प्रत्यक्ष निखळानंतर भाजपला केवळ ५८ तर आघाडीला १७८ जागा मिळाल्या होत्या.

३) २०१५ ची दिल्ली विधानसभा निवडणूक :

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तरप्रदेशात प्रचंड बहुमत मिळाले होते. भाजपने आपली पूर्ण ताकत दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत लावली होती. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत लागली होती. केंद्रात भाजपची सत्ता होती, दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती.

तेव्हा Exit Poll मध्ये आपच्या केजरीवालांना ७० पैकी ४० जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष निकालानंतर ७० पैकी ६७ जागेवर आम आदमी पार्टी विजयी झाल्याने सर्वांना धक्का बसला होता. त्यामुळे Exit Poll प्रत्येक वेळी बरोबरच असतील असे नसते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *