‘या कारणामुळे’ स्टेजवर छत्री असूनही पवारांनी केलं भरपावसात भाषण!

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या साताऱ्यात झालेल्या १८ तारखेच्या सभेचे राज्यभरातून सर्वत्र दिसत आहे. फेसबुक, ट्विटर सगळीकडे पवार ट्रेंडमध्ये आहेत. पवारांच्या पायाला दुखापत झाली असताना मागच्या काही दिवसांपासून ज्या तडफेने ते महाराष्ट्रात दूषकळग्रस्त, पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना आधार देत आहेत, ज्या जिद्दीने विधानसभा निवडणुकीत प्रचारसभा घेत फिरत आहेत;

त्यांचा तो जोश आणि उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. काल साताऱ्यात कोसळत्या पावसात पवारांनी भाषण केले. स्टेजवर छत्री असताना त्यांनी तासात भाषण करणे पसंत केले. नेमके यामागे काय कारण होते ते जाणून घेऊया…

साताऱ्यात आहे जोरदार लढत

मागच्या काही काळापूर्वी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच भाजपने जोरदार धक्का दिला. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. परंतु शरद पवारांनी आपले लहानपासूनचे मित्र श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादी कडून उमेदवारी देऊन भाजपला जोरदार धडकी भरवली.

प्रचारकाळात नरेंद्र मोदी आणि उदयनराजेंनी पवारांवर टीका केली होती. काल श्रीनिवास पाटलांच्या सांगता सभेसाठी पवार साताऱ्यात आले होते, त्यामुळे साहजिकच साताऱ्यात पवार काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.

पाऊस आणि पवार एकाचवेळी बरसात होते

पवार स्टेजवर येताना हलकासा पाऊस पडत असल्याने त्यांच्या सुरक्षारक्षकाने छत्री धरुन त्यांना स्टेजवर आणले. पवार भाषणाला उठले तेव्हा जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली. सुरक्षारक्षक छत्री उघडून पवारांवर धरायच्या प्रयत्नात असताना पवारांनी त्याला थांबवले. समोर सातारकर जनता पडत्या पावसात जागा न सोडता भाषण ऐकायला थांबले होते.

जवळपास ७९ वर्षे वय असणाऱ्या पवारांच्या पायाला दुखापत झाली असताना त्यांनी पावसातच भाषण करण्याचा निर्णय घेतला. कारण एकच होते, साताऱ्यात श्रीनिवास पाटलांना निवडून आणायचं ! पवारांनी सातारकरांकडे आपल्याकडून यापूर्वी चुकीचा उमेदवार दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या समोर कोण पैलवान दिसत नाही या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांनी सातारच्या जनतेला श्रीनिवास पाटलांना निवडून द्यायचे आवाहन केले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *