आपल्या गावातच करा हा व्यवसाय, महिन्याला मिळतील २५००० रुपये

शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर युवकांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो रोजगाराचा ! हाताला काम नसेल तर घर चालवायचे कसे हा प्रश्न त्यातूनच निर्माण होतो. मग ग्रामीण भागातील तरूण नोकरीच्या शोधात शहरांकडे धाव घेतात.

यावर्षी भारतात गेल्या ४५ वर्षांतला सर्वात कमी बेरोजगारी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यावरुनच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सरकारचे रोजगारनिर्मितीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक योजना आणली आहे, ज्याद्वारे आपल्या गावातून घरबसल्या महिन्याला २५००० रुपये कमावण्याची संधी बेरोजगारांना प्राप्त होणार आहे.

काय आहे ही योजना ?

केंद्र सरकारने आणलेल्या या योजनेचे नाव VIllage Level Entrepreneurs (VLE) असे आहे. इ-गव्हर्नन्स या योजनेच्या माध्यमातून सर्व सरकारी सेवा अल्पदरात नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने संपूर्ण देशात सामान्य सेवा केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

या केंद्रातून गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रातल्या दूरसंचार, शेती, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, बँक, पतसंस्था, विमा इत्यादींची सर्व प्रकारची सर्टिफिकेट, फॉर्म, बिल भरण्यात येणार आहेत. हे केंद्र चालवणाऱ्या तरुणांना VIllage Level Entrepreneurs म्हणजेच “ग्रामस्तरावरील उद्योजक” म्हणुन ओळखले जाणार आहे.

ग्राम स्तर उद्योजक होण्यासाठी आणि केंद्र सुरु करण्यासाठी काय करावे लागेल ?

ग्राम स्तर उद्योजक होण्यासाठी https://csc.gov.in या वेबसाईटवर आपल्याला नोंदणी करावी लागते. त्यासाठी आधारकार्ड बंधनकारक आहे. या माध्यमातून आपण सामान्य सेवा केंद्र सुरु करण्यासाठी Online अर्ज करु शकता. Offline अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या ठिकाणी जाऊन माहिती घ्यावी.

त्यानुसार तुमच्या अर्जाचा विचार करुन केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाते. केंद्र सुरु करण्यासाठी तुमच्याकडे १००-१६० स्क्वेअर फुट जागा, एक कॉम्प्युटर, प्रिंटर, वेब कॅमेरा, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, इंटरनेट कनेक्शन ही सामग्री आणि जवळपास दोन-अडीच लाखांची गुंतवणूक करावी लागते.

असे मिळतील महिन्याला २५०००रुपये

सामान्य सेवा केंद्र स्थापन केलं केल्यानंतर त्याठिकाणी सरकारी तसेच खाजागी क्षेत्रातील अनेक सेवा देता येतात. त्यामध्ये आधारकार्ड काढणे, पॅनकार्ड काढणे, मतदान ओळखपत्र काढणे, मतदारयादीत नावाचा समावेश करणे. तसेच मोबाईलचे रीचार्ज, पोस्टपेड बिल भरणा, डिश टीव्ही रीचार्ज, पैसे पाठवणे, विमा हप्ता, वीज बिल भरणा, इन्शान इत्यादि सेवा देण्यात येतील. सरकारच्या माहितीनुसार सामान्य सेवा केंद्राच्या माध्यमातून महिन्याला सरासरी २५००० रुपये कमवता येतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *