‘या’ मनसेच्या उमेदवाराला मिळाली राज्यमंत्रीपद, २० कोटी रोख कोट्यवधींच्या कंत्राटाची ऑफर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हाय प्रोफाइल मानल्या जाणाऱ्या कोथरूड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेने पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिेंबा दिलेला आहे.

पुण्यातील कोथरूडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलत चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मेधा कुलकर्णी या नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. तसंच कोथरूडमधून स्थानिक उमेदवार द्यावा यासाठी चंद्रकांत पाटील यांना विरोध करण्यात आला होता.

कोथरूड मतदारसंघातून कोथरूडमधील स्थानिक कोथरूडकर उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. तशी मतदारसंघातील नागरिकांमध्ये भावना आहे. काल (ता.१८) शिंदे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचार सभा कोथरूडमध्ये पार पडली. या सभेला कोथरुडकरांनी चांगली गर्दी केली होती.

कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. या सभेत किशोर शिंदे यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

स्थानिक कार्यकर्त्यांचा हक्क हिरावून घेवून कोथरूडकरांना गृहीत धरले जात आहे. कोथरूडकरांना गृहीत धरून त्यांचा स्वाभीमान चिरडण्याचे काम कोथरूडचे भाजप- शिवसेना- रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत पाटील करत आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

शिंदेंना दिली होती राज्यमंत्रीपदाची ऑफर-

कालच्या सभेत शिंदे यांनी काही धक्कादायक आरोप केले आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना राज्यमंत्रीपद २० कोटी रुपये आणि तब्बल २०० कोटींच्या पीडब्ल्यूडीच्या कंत्राटाची ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

किशोर शिंदे यांनी पुढे बोलताना म्हंटले कि स्थानीक आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी, चंद्रकांत मोकाटे यांच्याकडे नागरिक प्रत्येक्ष समस्या घेऊन जाऊ शकत होते. पण यांना निवडून दिले तर यांना कुठे शोधात फिरायचं. त्यांनी कोथरूडमध्ये भाड्याने घेतलेलं घर हे खडकवासला मतदारसंघामध्ये आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *