मुसळधार पावसात सभेला संबोधित करून शरद पवारांनी जिंकली मनं, बघा व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज (१८ ऑक्टोबर) साताऱ्यात भरपावसात सभा घेतली. त्यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली आहे. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या ८० व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा होणार होती. सभा सुरु असताना मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले.

आम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकांसाठी चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरूस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरातून वाट पाहात आहे. २१ तारखेला हा तरुणवर्ग निर्णय घेईल, असे म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष्य केलं.

त्यांच्या या सभेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांनी यावेळी उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, असंही शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केले.

भरपावसात रात्री 8 वाजता पवारांची सभा सुरु होती. या सभेला व्यासपीठावर पवार पावसात भिजून जनतेला संबोधित करत होते. पवारांच्या हे रुप पाहून सातारकर भारावले होते, तसेच पवारांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद उपस्थितांकडून मिळत होता.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *