राष्ट्रवादीचा प्रचार करणाऱ्या या भाजपच्या महापौर नेमक्या आहेत तरी कोण?

निवडणुक लढवणाऱ्या प्रत्येक पक्षाला बंडखोरी, पक्षांतर, फोडाफोडी, गटबाजीचे राजकारण अशा अनेक समस्यांवर मात करुन निवडणुकीला सामोरे जायचे असते. निवडून येण्याच्या क्षमतेवरच प्रत्येक पक्ष उमेदवारांना तिकिटाचे वाटप करतो.

पक्षाचा जाहीरनामा तयार केला जातो. पक्षाचे मोठमोठे नेते प्रचारसभा घेतात, उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करतात.कार्यकर्त्याना जेवण, प्रचारासाठी होर्डिंग्ज, जाहिराती, प्रचार, इत्यादि खर्च करतात.

पण ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढवायची ते पुढारीच पक्षाचे काम करत नसतील तर काय करायचं ? अशाच प्रकारचा प्रश्न सध्या भाजपला पडला असणार, कारण भाजपच्या एक महिला महापौर चक्क राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत.

महापौर भाजपच्या प्रचार राष्ट्रवादीचा

उल्हासनगर विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महापौर असणाऱ्या पंचम कलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्यात तिकिटावरून संघर्ष निर्माण झाला होता. परंतु ऐनवेळी पक्षाने कुमार आयलानी यांचे नाव घोषित केल्याने पंचम कलानी नाराज झाल्या.

त्याचवेळी त्यांच्या सासूबाई ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून AB फॉर्म घेतला.राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपच्या महापौर असणाऱ्या त्यांच्या सुनबाई पंचम कलानी उपस्थित होत्या.

भाजपची कारणे दाखवा नोटीस

महापौर असूनही भाजपच्या उमेदवाराचा प्रचार न करता पंचम कलानी या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करतात, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेलाही त्या अनुपस्थित राहिल्या या कारणाने पक्षाने त्यांना करणे दाखवा नोटीस पाठवून जाब विचारला.

यावर विचारले असता पंचम कलानी यांनी “मला जर अशी नोटीस कुणी आठवली तर मी फाडून त्यांच्या तोंडावरती फेकेन” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या असणाऱ्या आपल्या सासुचाच प्रचार करणार असल्याचे ज्योती कलानी यांनी सांगितले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *