भाजपच्या या ४ दिग्गज मंत्र्यांचा होऊ शकतो पराभव, अंतर्गत सर्व्हेत धक्कादायक खुलासा

विधानसभा निवडणूक अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या ५ दिवस अगोदर भाजपने एक अंतर्गत सर्वे केला आहे. ज्यामध्ये काही धक्कादायक निकाल लागू शकतात असे सांगण्यात आले आहे.

भाजपला राज्यात मोठा विजय होईल असा विश्वास आहे. अंतर्गत सर्व्हेमध्ये देखील मोठा विजय मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजप या निवडणुकीत मित्रपक्षाचे मिळून १६४ जागांवर निवडणूक लढवत आहे. या १६४ जागांचा हा सर्वे करण्यात आला. या सर्वेनुसार भाजपचा १६४ पैकी १२२ जागांवर विजय होईल तर २ जागांवर पराभव होईल असे सांगण्यात आले आहे. तर उर्वरित ४० जागांवर टफ फाईट असल्याचे चित्र आहे.

भाजपच्या नेत्यांकडून पूर्वीपासूनच युतीला २२० जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, भाजपने आपला १२२ जागांवरील विजय निश्चित असल्याचे सांगत, ४० मतदारसंघांना डेंजर झोनमध्ये ठेवले आहे. तर, दोन मतदारसंघात पराभव मान्य केला आहे.

दरम्यान, ही निवडणूक भाजपच्या ४० उमेदवारांसाठी खडतर आहे. त्यामध्ये चार विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या या सर्व्हेनुसार बारामती आणि मालेगाव मध्य या दोन मतदार संघांमध्ये भाजपचा पराभव होणार आहे. बारामतीत अजित पवार निवडणूक जिंकतील तर मालेगावमध्ये कांग्रेसचे विद्यमान आमदार आसीफ शेख जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोण आहेत हे ४ मंत्री?

हि निवडणूक तशी अनेक दिग्गजांना कठीण मानली जात आहे. पण भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत मात्र ४ मंत्र्यांना धोका असल्याचे समोर आले आहे. यामध्ये महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघाचा समावेश आहे. परळीत पंकजा यांच्यासमोर त्यांचेच चुलत बंधू धनंजय मुंडे यांचे आव्हान असणार आहे. परळीत पंकजा यांच्या प्रचारासाठी लवकरच पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे.

या ४ मंत्र्याच्या दुसरे मोठे नाव आहे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघाचा समावेश आहे. आशिष शेलार यांना हि निवडणूक सोपी नाहीये. इथे धक्कादायक निकाल बघायला मिळू शकतो. वांद्रे पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांच्याकडून जोरदार फाईट मिळेल, असा अंदाज भाजपच्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच मंत्री राम शिंदे यांना कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित आहे. तसेच परिणय फुके यांना साकोली मतदारसंघात काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून मोठं आव्हान आहे. या दोघांमध्ये मोठी फाईट पाहायला मिळेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *