म्हणून ओमराजेंसोबत उचलले ते पाऊल.. तरुणाने व्हिडीओ टाकून सांगितले कारण, बघा व्हिडीओ

उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर काल कळंब तालुक्यातील एका गावात ह ल्ला झाला होता. यात त्यांना भो सकून मारण्याचा प्रयत्न माथेफिरूने केला होता. या ह ल्ल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती.

दिवसाढवळ्या एका खासदारावर प्रा णघातक ह ल्ला झाल्याने सर्वाना धक्का बसला होता. हा हल्ला नेमका कशासाठी केला यावरून तर्कवितर्क लावण्यात येत होते. या हल्यात ओमराजे हे बालबाल बचावले.

अजिंक्य टेकाळे नावाच्या तरुणाने हा ह ल्ला केल्याचे नंतर उघड झाले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अजिंक्य हा कळंब तालुक्याचा भाजपचा आयटी सेलचा तालुकाध्यक्ष आहे.

मी भाजपचा कार्यकर्ता, मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा,’ असे म्हणणारा ओम राजे निंबाळकरांवर हल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रात्रीच्या अंधारात शुट केलेल्या व्हिडीओत अजिंक्य म्हणतो, “मी 18 व्या वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. ओमराजे निंबाळकरांनी महायुतीत बंडखोरी केल्याचे पाहून मी हे पाऊल उचलेले.

ओमराजे निंबाळकर यांनी कारखाना बंद पाडला, हजारो तरुणांना बेरोजगार केले. हजारो घर बेघर केली. त्यामुळे मी हे पाऊल उचलले. . आमच्या भाजप पक्षाला कळंब तालुक्यात कमी समजतात म्हणून मी हे पाऊल उचलले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला न्याय द्यावा, ही विनंती, ”

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *