राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंची हुबेहूब नक्कल करताना कधी बघतीले का, बघा व्हिडीओ..

राज ठाकरे हे मनसेच्या राज्यभरातील विविध भागात उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. लाव रे तो व्हिडीओ ने लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी अनेक गोष्टींवर टीकेची झोड उठवली होती. राज हे विविध मुद्यांवरून आता राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. राज हे नेहमीच आपल्या भाषणातून विरोधकांचा समाचार घेत असतात.

राज ठाकरे यांना अनेकदा आपण भाषणातून नक्कल करताना बघितले असेल. सध्या त्यांनी केलेल्या एका नकलेची सर्वत्र चर्चा होत आहे. पुण्यातील कसबा पेठ येथील मनसेच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नक्कल केली.

निवडणुकीच्या आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एक हाती भगवा फटकवण्याची घोषणा केली होती. त्याच भाषणाची नक्क राज यांनी मंचावरुन केली.

युतीच्या जागा वाटपात पुण्यामध्ये शिवसेनेला भाजपाने एकही जागा सोडलेली नाही. याच मुद्द्यावरुन ‘पुण्यामध्ये शिवसेना नावाचं काही दिसतं नाही, त्यांना हेही अजून कळत नाही की भाजपावाले रोज त्यांची इज्जत काढता. पुणे आणि नाशिकसारख्या शहरामध्ये एक जागा देत नाहीत. काय करुन ठेवलयं,’ असा टोला राज यांनी शिवसेनेला लगावला.

राज यांनी आज नाशिक येथे झालेल्या सभेत देखील अशीच नक्कल करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. नाशिक मध्ये देखील सेनेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सेनेवर टीका केली. ‘यापुढे आम्ही एक हाती भगवा फडकवू, भाजपाबरोबरची आमची इतकी वर्ष सडली,’ ही वाक्य म्हटली. त्यानंतर ‘जर युती इतकी वर्ष सडली तर यंदा १२४ वर का सडली?’, असा सवाल राज यांनी सभेमध्ये उपस्थित केला.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *