सबसिडी म्हणजे काय आणि ती किती प्रकारची असते ?

आपण अनेकदा सबसिडी हा शब्द ऐकला असेल. पण त्याचा नेमका अर्थ काय असतो हे अनेकांना माहित नसते. सबसिडी किंवा अनुदान हे एक प्रकारचे आर्थिक सहाय्य असते, जे सरकारकडून शेतकरी, उद्योग, ग्राहक (मुख्यतः गरीब) इत्यादिंना पुरवले जाते.

सबसिडीमुळे लोकांच्या इच्छित वस्तूंच्या किंमती खाली येतात. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणाला सांगणार आहोत की सबसिडी कोणकोणत्या प्रकारच्या असतात आणि या सबसिडीवर भारत सरकार दरवर्षी किती कोटी रुपये खर्च करते.

सबसिडीचे प्रकार कोणकोणते असतात ?

१) अन्न सबसिडी : या प्रकारच्या अनुदानामध्ये सरकार सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे गरिबांना धान्य (तांदूळ, गहू, साखर) इत्यादी पुरवते.

२) शेतकरी सबसिडी : या प्रकारच्या अनुदानामध्ये शेतकऱ्यांना खताचे अनुदान, रोख अनुदान, व्याज माफी, वाहने आणि इतर उपकरणे खरेदी करण्यासाठीच्या अनुदानाचा समावेश आहे.

३) इंधन सबसिडी : या अनुदानात दारिद्र्य रेषेखालील लोकांना सरकार स्वस्त दरात रॉकेल पुरवते. याशिवाय एलपीजी, डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्येही सरकार अनुदान पुरवते.

४) कर सबसिडी : हे अनुदान मुख्यत: मोठ्या व्यावसायिकांना दिले जाते, जेणेकरून हे व्यावसायिक जादा गुंतवणुकीच्या परीस्थितीत आपले उत्पादन थांबवू नयेत आणि देशात बेरोजगारी पसरू नये. बर्‍याचदा सरकार या व्यावसायिकांना आयात व निर्यातीवर कर अनुदान देते.

५) धार्मिक सबसिडी : हे अनुदान मुस्लिम समाजातील लोकांना हज यात्रा आणि हिंदू समाजातील लोकांना अमरनाथ यात्रा करण्याण्यासाठी सरकारकडून देण्यात येते.

६) व्याज सबसिडी : या अनुदाना अंतर्गत सरकार स्वतः शैक्षणिक कर्जावरील व्याज भरते. तसेच शेतकरी व उद्योगपतींचे व्याजदेखील सरकार माफ करत असते.

सबसिडीमागचे उद्देश

आपल्याला सांगितल्याप्रमाणे शेतकरी, उद्योजक किंवा ग्राहक यांना इच्छित असणाऱ्या वस्तूंच्या किंमती खाली आणणे हा सबसिडीचा मुख्य उद्देश असतो. त्यासोबतच देशामध्ये ज्यादा उत्पादन आणि वापरला प्रोत्साहन देण्यासाठी, दुर्बल घटकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक कल्याणाच्या संकल्पनेला चालना देण्यासाठीही सबसिडी दिली जाते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *