आयएएस परीक्षेची तयारी सुरू करण्याची योग्य वेळ कोणती ?

नागरी सेवेमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना पडणारा पहिला प्रश्न म्हणजे “आयएएस परीक्षेची तयारी कधी सुरू करावी ?” आयुष्यातील इतर सर्व महत्वाच्या प्रश्नांप्रमाणेच त्यांना या प्रश्नाचेही कोणतेही निश्चित, सोपे आणि थेट उत्तर मिळत नाही. भारतातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षा म्हणून ओळखली जाणारी आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यापक योजना तयार करणे आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक असते यात शंका नाही.

आयएएस परीक्षेची तयारी सुरू करण्यासाठी योग्य वेळ कोणती हे ठरवावं लागतं तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये बराच गोंधळ आणि अडचणी उद्भवतात. बऱ्याच आयएएस टॉपर्सनी दहावीच्या बोर्ड परीक्षेनंतरच आयएएसच्या तयारीला सुरुवात केल्याचे किंवा पदवीनंतर एक वर्षाची तयारी केल्यानंतर पहिल्या प्रयत्नातच आयएएससारखी प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे उदाहरण आपण अनेक मार्गदर्शन शिबिरांमधून ऐकले असेल. पण एकंदरपणे आयएएसची तयारी करणाऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी तीन वेगवेगळ्या वेळेच्या घटकांचा विचार करुन वर्गीकरण केले आहे.

शाळेत असतानाची तयारी

अनेक विद्यार्थ्यांना शाळेच्या काळापासूनच आयएएसच्या तयारीसाठी प्रवृत्त केले जाते. याबाबतीत फायदा किंवा तोटा यापैकी काहीही होऊ शकते. आपल्या शैक्षणिक करिअरच्या सुरुवातीपासून आयएएसची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा भक्कम पाया तयार होतो.

त्यादृष्टीने विद्यार्थी NCERT च्या शालेय पुस्तकांचा मन लावून अभ्यास करतात. काहीवेळा हे नुकसानदायकही होऊ शकते. याकाळात विद्यार्थी तत्कालीन पॅटर्ननुसार अभ्यास करतात. परंतु आयएएस परीक्षांचा अभ्य्साकर्म, पॅटर्न, ट्रेंड बदलत राहतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळातच विद्यार्थ्यांना अडचणी येतात आणि त्यांच्याबाबतीत हताश होण्याचे प्रसंग घडतात.

कॉलेजमध्ये असतानाची तयारी

कॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातही सर्वात रोमांचक काळ मानला जातो. पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांवर अधिक अभ्यास करण्याचा दबाव नसतो. त्यामुळे आयएएसच्या तयारीला सुरुवात करण्यासाठी हा आदर्श काळ मानला जातो आणि विद्यार्थी स्वयंअध्ययन किंवा खाजगी कोचिंग क्लास लावून आपल्या आयएएसच्या तयारीचा पाया भक्कम करू शकतो.

ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी आयएएस परीक्षेसाठी पात्र असतात. ते परीक्षा देऊ शकतात. जे विद्यार्थी पदवीनंतर आयएएसची तयारी सुरू करतात त्यांना आयएएस परीक्षेत पास होण्याची चांगली संधी असते, कारण त्यांना आयएएस परीक्षेचा नमुना आणि ट्रेंड माहित असतात. परंतु पदवीदरम्यान आयएएसची तयारी सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय अशी आहे की ते कॉलेजमधील शिकण्याच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग मानल्या जाणार्‍या इतर प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. जर दीर्घकालीन दृष्टीकोनातून याचा विचार केला गेला तर केवळ पुस्तकांवर अवलंबून राहून आयएएस परीक्षा पास करणे शक्य नाही.

पोस्ट-ग्रॅज्युएशननंतरची तयारी

पदवी पूर्ण केल्यावर नागरी सेवेची तयारी करणाऱ्यांना “लेट” मानले जाते. बरेच लोक असेही मानतात की जे लोक आयएएस परीक्षेची तयारी उशिरा सुरु करतात किंवा पदवीनंतर सुरु करतात, त्यांची आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता कमी असते. तथापि, हे पूर्णपणे सत्य नाही. ही केवळ एक मिथक आहे.

असे बरेच आयएएस टॉपर्स आहेत ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन दरम्यान आयएएस परीक्षेची तयारी सुरू केली आणि आयएएस परीक्षेत यशस्वीही झाले. याव्यतिरिक्त अशीही उदाहरणे आहेत की बरेच विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करण्यास प्राधान्य देतात आणि नंतर बर्‍याच वर्षांनी काम करून आयएएस परीक्षेची तयारी करुन उत्तीर्ण होतात.

वरील चर्चेनंतर हे स्पष्ट होते की आयएएस तयारी प्रक्रिया सुरू करण्यासाठी कोणताही निश्चित किंवा योग्य वेळ नाही. योग्य वेळेऐवजी आयएएस इच्छुकांनी आयएएससारख्या परीक्षेसाठी स्वतःची तयारी प्रक्रिया किती समर्पित आणि वचनबद्ध आहे याचा विचार केला पाहिजे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *