पॅनकार्ड हरवले असेल तर या प्रक्रियेने घरबसल्या मिळवा नवीन पॅनकार्ड

आजच्या काळात ओळखीच्या पुराव्यासहित इतर अनेक कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. अनेकदा निष्काळजीपणामुळे पॅनकार्ड खराब होते अथवा ते हरवून जाते. जर आपले पॅनकार्ड खराब झाले असेल किंवा ते कुठेतरी हरवले असेल तर काळजीचं कारण नाही.

आपल्या पॅनकार्डची दुसरी प्रत आपण सहजपणे मिळवू शकता. आयकर विभाग UTITSL किंवा NDSL-TIN मार्फत पॅन कार्ड जारी करत असतो. आपले पॅनकार्ड यापैकी ज्या एजन्सीने जारी केले असेल त्यांना संपर्क करुन आपण आपल्या पॅनकार्डची दुसरी प्रत मिळवू शकता.

पॅनकार्डचे पुनर्मुद्रण कसे करावे

आपल्या पॅन कार्डचे पुनर्मुद्रण करण्यासाठी UTITSL किंवा NDSL-TIN ऑनलाइन पोर्टलवर जाऊन तुम्ही “Reprint PAN card” या पर्यायावर क्लिक करू शकता. या सुविधेच्या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्या पॅन कार्डची प्रत मिळवू शकता. या दरम्यान आपले पॅन कार्ड आपण कोणत्या पत्त्यावर मागवू शकता किंवा आपल्या पत्त्यामध्ये काही बदल करायचे असतील तर तो पर्याय देखील उपलब्ध असतो. त्यासाठी दोन्ही एजन्सी ५० रुपयांची फी आकारतात.

भारताबाहेरच्या पत्त्यावर पॅनकार्ड मागवायचे असेल तर ९५९ रुपये फी आकारली जाते. त्यासाठी अर्ज करतेवेळीच आपले पॅनकार्ड कोणत्या पत्त्यावर वितरित करायचे आहे ते नमूद करावे लागते. आपण जर पत्ता बदलला नाही तर पॅनकार्डची प्रत केवळ पूर्वीच्या नोंदणीकृत पत्त्यावरच पाठवली जाते.

पॅनकार्डच्या छापील प्रतीसाठी अर्ज करताना तुम्हाला तुमचा जुना पॅनकार्ड क्रमांक व जन्मतारीख लागेल. NSDL आपल्या आधारकार्डची देखील मागणी करु शकतात, कारण आपले पॅनकार्ड आपल्या आधारकार्डला लिंक करणे आवश्यक असते.

ई-पॅन कार्ड

आयकर संबंधित नियमांमध्ये बदल झाले असल्यामुळे आपल्या पॅनकार्डची हार्ड कॉपी आवश्यकता नसते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सॉफ्ट कॉपीसुद्धा वापरु शकता. UTITSL किंवा NDSL-TIN या दोन्ही एजन्सी ई-पॅनकार्ड जारी करतात. नवीन व जुन्या पॅनकार्डधारकांना ही सुविधा लागू आहे. तथापि, आयकर विभागाने जारी केलेली पॅनकार्डची पीडीएफ फाइल देखील यासाठी वैध असते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *