जेव्हा मुस्लिम असल्यामुळे बदलली गेली एपीजे अब्दुल कलाम यांची जागा..

आज भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती. एपीजे अब्दुल कलाम यांना देशवासियांकडून प्रचंड प्रेम मिळाले. पण त्यांना देखील एकदा मुस्लिम असल्यामुळे भेदभावाचा सामना करावा लागला होता. एपीजे अब्दुल कलाम यांनीच आपल्या आत्मचरित्रात याबद्दल खुलासा केला होता. खासरेवर जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं.

अब्दुल कलाम यांनी आपलं आत्मचरित्र ‘माय लाइफ’ मध्ये लिहिलं आहे कि मुस्लिम असल्यामुळे एकदा त्यांचं सीट बदलण्यात आलं होतं. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम या गावी झाला. त्यांचे वडील हे एक न्हाविक होते. सुरुवातीपासून त्यांच्या घरची परिस्थिती गरीब होती. त्यामुळे लहानपणा पासूनच ते गावात वर्तमानपत्र विकून व अन्य छोटी मोठी कामे करून पैसे कमावत.

त्यांनी आपले शालेय शिक्षण फार साधारण शाळेत पूर्ण केले. रामेश्वरम मधील एलीमेंट्री शाळेत असताना कलाम यांची मैत्री एका ब्राम्हण विद्यार्थ्यांसोबत झाली. रामनाधा शास्त्री नाव असं त्या विद्यार्थ्यांचे नाव होतं. ते दोघे चांगले मित्र बनले. त्यामुळं वर्गात ते सोबतच बसत असत.

शाळेत ते मित्र म्हणून विविध गोष्टी करत असत. कधी वर्गात नाव बनवून त्यावर किड्यांची सफर करत. तर कधी आणखी काही. पण एक दिवशी वर्गात नवीन शिक्षक आले. त्यांनी कलाम आणि शास्त्री यांच्या पेहरावावरूनच ओळखलं कि एक मुस्लिम आणि ब्राम्हण विद्यार्थी सोबत बसत आहेत. त्यांना हे पटलं नाही.

ते यामुळे नाराज होते. कलाम यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे कि,’त्यांनी मला उठवून दुसऱ्या जागेवर बसवले. त्यामुळं मी नाराज आणि दुःखी झालो. मला आठवते कि तेव्हा मी रडलो होतो. कारण माझ्या जिवलग मित्रासोबतची जागा माझ्यापासून हिसकावली होती. कोणाला माहिती होते कि हिंदू मुस्लिम सोबत बसू शकत नाही.’

रामनाधा शास्त्रीचे वडील हे रामश्वरम मधील शिव मंदिरात पुजारी होते. त्याच संध्याकाळी त्यांना हि घटना कळली. ते त्यावेळी कलाम यांच्या वडिलांसोबत बोलले. त्यानंतर दोघे शाळेत गेले आणि धर्म शाळेत नाही आला पाहिजे यावरून शिक्षकाची कानउघाडणी केली. त्यानंतर शिक्षकांनी त्या दोघांना शेजारी बसू देण्यास सुरुवात केली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *