भाजपला मोठा धक्का, या मतदारसंघात ‘मोहिते पाटलांनी’ दिला राष्ट्रवादीला पाठिंबा

विधानसभा निवडणूक आता अवघ्या आठवड्यावर आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होत असून 24 ऑक्टोबरला मतमोजनी होईल. त्यामुळे आता महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुतीसमोर विरोधकांनी चांगलेच आव्हान निर्माण केले असून युतीला धक्का देत राजकीय कमबॅक करण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

२०१४ मध्ये मोदी लाटेत सर्वच पक्ष वेगवेगळे लढले. भाजप या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष बनला आणि नंतर सेनेसोबत युती करत युतीचं सरकार स्थापन झालं. या निवडणुकीच्या अगोदर भाजपने मोठी मेगाभरती केली. यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केला.

राष्ट्रवादीमधील मोठी दिग्गज घराणी भाजपमध्ये गेली. त्यामुळे भाजपला हि निवडणूक सोपी होईल असे वाटत होते. पण विरोधक देखील मोठ्या ताकतीने उतरले आहेत. सर्वच पक्षांनी उमेदवार चांगले दिले आहेत. अनेक ठिकाणी तिरंगी चौरंगी लढत होणार असून काही जागांवर युतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे जागांवर आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

माळशिरस मतदारसंघात भाजपला मोठा धक्का-

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मतदानाला अवघा आठवडा उरला असताना भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघात आता भाजपने उपरा उमेदवार दिल्याने जनसेवा संघटनेचे नेते धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले. त्यामुळं भाजपला याचा मोठा फायदा झाला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माढ्यात भाजपचा उमेदवार विजयी झाला. लोकसभा निवडणुकीत माळशिरस मधील सर्वच विरोधक एकत्र आल्यानंतर एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य भाजप उमेदवारास मिळाले.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने इथे नवखा आणि स्थानिक उमेदवार न देता दुसऱ्या जिल्हयातील उमेदवार दिला आहे. त्यामुळे अनेक सक्षम स्थानिक उमेदवार असताना आम्ही बाहेरच्यांना का मतदान करायचं? अशी भावना माळशिरस मतदारसंघात आहे.

स्थानिक उमेदवार डावलत केवळ स्वार्थासाठी बाहेरचा उमेदवार दिल्याने धवलसिंह यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता माळशिरसमध्ये भाजप विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होण्याऐवजी मोहिते पाटील विरूध्द मोहिते पाटील असा सामना होणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *