दरवर्षी यूपीएससी मार्फत किती IAS अधिकाऱ्यांची भरती होते ?

सर्वसाधारणपणे असा एक समज आहे की हा देश मंत्र्यांद्वारे नव्हे तर नोकरशहाद्वारे चालविला जातो. हे नोकरशहा म्हणजे वरिष्ठ आयएएस अधिकारी असतात जे पदोन्नतीने भारत सरकारचे सचिव होतात.

हे अधिकारी कुठल्या विशिष्ट विषयात तज्ञ नसतात, तर असे सामान्य प्रशासकीय अधिकारी असतात जे प्रत्येक मुद्द्याच्या समर्थनातील आणि विरोधातील बाबी लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतात. ते मंत्रालयांमधील सर्व प्रमुख स्थानावर कार्यरत असतात आणि आणि देशातील सर्व धोरणे तयार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतात.

केंद्रीय लोकसेवा आयोग हा एकमेव आयोग आहे जो सरकारी मंत्रालयातील उच्च पदांसाठी केंद्रीय भरती संस्था म्हणून काम करतो. आयएएस आणि इतर केंद्रीय नागरी सेवकांची भरती भारताच्या अत्यंत प्रतिष्ठित परीक्षेच्या माध्यमातून केली जाते, ज्याला सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा म्हणतात. गेल्या सहा-सात वर्षांत सिव्हिल सर्व्हिसच्या जाहिरातीमध्ये सुमारे एक हजार पदे रिक्त होत्या, पण आयएएस अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या जाहिरातीमध्ये कुठेही लिहिलेली नसते.

उमेदवारांसाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांच्या संख्येबद्दल कायम उत्सुकता असते. दरवर्षी अशी चर्चा असते की यावेळी आयएएसच्या रिक्त पदांची संख्या २०० किंवा त्याहून अधिक असेल. परंतु आयएएस परीक्षेच्या मागच्या काही निकालांचे विश्लेषण केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, दरवर्षी भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये साधारणपणे १८० उमेदवारांची निवड केली जाते.

इतर सेवांच्या रिक्त जागांची संख्या वाढत किंवा कमी होत असूनही, दरवर्षी केवळ १८० च आयएएस अधिकारी भरती केले जातात. गेल्या दशकात सरकारने बसवण समिती स्थापन केली होती. या समितीने २०१०-२०२० या कालावधीत सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांची संख्या, केडर आढावा धोरण आणि नियम, राज्यांच्या केडर आढावा अधिकारी आणि कार्यपद्धती यावर विचार केला व काही सूचना केल्या होत्या.

सध्या ५६९ IAS अधिकाऱ्यांचा अनुशेष आहे आणि पुढील दहा वर्षांत २३०० अधिकारी सेवानिवृत्त होतील आणि या सर्व बाबी लक्षात घेऊन दरवर्षी १८० अधिकाऱ्यांची प्रत्यक्षरित्या निवड करावी. अशी त्यात सूचना करण्यात आली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *