महाराष्ट्रातले मोठे दिग्गज नेते बाल बाल बचावतात तेव्हा!

राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी असते. राजकारणात विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जाव्यात हे लोकशाहीला अपेक्षित असते. अनेक राजकीय नेते सत्तेत असताना त्यांचे विरोधक त्यांच्याबद्दल जनमत प्रक्षुब्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. अशा चिथावणीला बळी पडून काही लोक राजकीय नेत्यांचे चारित्र्यहनन ते त्यांच्यावरील शारीरिक ह ल्ले करण्यापर्यंतच्या कारवायांमध्ये सहभागी होतात. महाराष्ट्राच्या इतिहासातील अशाच काही लोकप्रिय राजकीय नेत्यांवरील ह ल्ल्याचे काही प्रसंग मांडण्याचा याठिकाणी प्रयत्न केला आहे…

१) शंकरराव मोहिते पाटलांवरील प्रसंग

साधारणपणे १९७२-७८ दरम्यानची ही घटना आहे. माळशिरस मतदारसंघात शंकरराव मोहिते पाटील आणि शामराव पाटील यांच्यात राजकीय वैमनस्य होते. एके दिवशी शंकरराव मोहिते पाटील अकलूजवरून पाटसमार्गे पुणे-मुंबईला निघाले होते. पाटसच्या घाटात त्यांच्यावर डायरेक्ट बॉम्बह ल्ला झाला. त्या ह ल्ल्यात शंकरराव जखमी झाले. पोलीस केस झाल्या. शामराव पाटलांना आरोपी म्हणून अटक झाली.

याबद्दलची सविस्तर माहिती त्यावेळच्या “श्री” नावाच्या साप्ताहिकात आली होती. दरम्यान आणीबाणी येऊन गेली. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत शामराव पाटलांनी यशवंतराव मोहिते पाटलांचा पराभव केला. अनंत माने यांनी “लक्ष्मी” नावाच्या मराठी चित्रपटात अकलुजचे राजकारण आणि मोहिते पाटलांवरील बॉम्बह ल्ला याचे चित्रण केले होते.

२) शरद पवार यांच्यावरील प्रसंग

२०११ मध्ये शरद पवार कृषिमंत्री असताना इफकोच्या एका कार्यक्रमानिमित्त दिल्लीच्या NDMC केंद्रावर आले होते. कार्यक्रमानंतर पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि ते निघाले. पवार पायऱ्यांवरुन खाली उतरत असताना तिथे दबा धरुन बसलेल्या हरविंदरसिंग नावाच्या एका माथेफिरुने पवारांच्या अंगावर धावून त्यांना चापट मारली.

सुरक्षारक्षकांनी त्वरित त्याला पकडले. त्याच्याकडील चाकू काढून घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यापूर्वीही या तरुणाने माजी दूरसंचारमंत्री सुखराम यांच्यावरही असाच ह ल्ला केला होता.

३) बाळासाहेब ठाकरेंवरील प्रसंग

बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पत्नी मीनाताई यांच्यासोबत दादरहुन वांद्राला चालले होते. बाळासाहेब स्वतःच गाडी चालवत होते. माहीममध्ये आल्यावर एका मुस्लिमबहुल भागात एक टॅक्सीचालक त्यांच्या गाडीला आडवा आला. त्याने रस्त्यावरच टॅक्सी उभा करून तो बाळासाहेबांसोबत भांडू लागला.

आजूबाजूचे लोक गोळा झाले. टॅक्सीचालक मुस्लिम असल्याने जमावातील काही लोक अरेरावी करत बाळासाहेबांच्या अंगावर धावून गेले. पण बाळासाहेबांनी प्रसंगावधान पाहून खिशातून पि स्तूल काढला. ज्येष्ठ मुस्लिम नागरिकांनी मध्यस्थी करत टॅक्सीचालकाला आणि वातावरण चिघळण्यापासून थांबवले.

४) हर्षवर्धन पाटलांवरील प्रसंग

२०१४ मध्ये धनगर समाजाला ST आरक्षण मिळावे या मागणीसाठी बारामतीमध्ये मोठे आंदोलन सुरु होते. जवळच भिगवण येथे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील एका कार्यक्रमानिमित्त आले होते.

कार्यक्रम संपवून बाहेर पडत असताना काही धनगर आंदोलकांनी त्यांना घेराव घालत जाब विचारायला सुरुवात केली. त्यातल्या तिघांनी अचानकपणे जेटीयन व्हायोलेट नावाचे केमिकल असणारी शाई त्यांच्यावर फेकली. तसेच धक्का बु क्कीचाही प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याला जबर दु खापत झाली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *