भारतातील गुन्हेगार फरार होऊन ब्रिटनमध्येच शरण का घेतात ?

भारतातुन हजारो कोटींची कर्ज घेऊन विजय माल्या, ललित मोदी, निरव मोदी सारखे अनेक कर्जबुडवे फरार झाले. विरोधी पक्ष सरकारवर दबाव आणून अशा पळून गेलेल्या उद्योगतींना पकडून आणून यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करत असतात.

भारतातून पळून गेलेल्यांपैकी बरेच लोक ब्रिटनमध्ये शरण घेतात. मागच्या वर्षी भारताने अशा ५७ फरारींची यादी ब्रिटनला सोपवली होती. आकडेवारी सांगते की २०१३ पासून जवळपास ५५०० भारतीय लोक ब्रिटनमध्ये आहेत, त्यापैकी सगळेच लोक गुन्हेगार नाहीत.

काय कारण आहे ज्यामुळे फरारी गुन्हेगार ब्रिटनमध्ये शरण घेतात ?

भारतावर जवळपास दीडशे वर्ष इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज भारतातून निघून गेल्यानंतरही इंग्रजांचे अनेक कायदे भारतात लागू आहेत. भारताची आणि ब्रिटनची कायदेप्रणाली जवळपास एकसारखी आहे. भारत आणि ब्रिटनमधील कायदेतज्ञांना दोन्ही देशांच्या कायदेप्रणालीबाबत चांगली माहिती असल्याने फरारी लोकांना त्याचा लाभ होतो. तसेच ब्रिटनमधील मानवाधिकार आयोग जगातील इतर देशांपेक्षा खूप कडक आहे.

जर ब्रिटनच्या न्यायालयाला वाटले की गुन्हेगाराचे प्रत्यार्पण केल्यावर त्याला भारतात मृत्युदंडाची शिक्षा होईल किंवा त्याचा छळ होईल अथवा राजकीय कारणांसाठी त्याचे प्रत्यार्पण केले जात आहे; अशावेळी ब्रिटनचे न्यायालय प्रत्यार्पणाची मागणी फेटाळून लावते. निरव मोदीच्या बाबतीत हेच राजकीय कारण सांगण्यात आले होते.

भारत आणि ब्रिटनमध्ये १९९२ मध्ये प्रत्यार्पण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ब्रिटनने आतापर्यंत केवळ २०१६ मध्ये समीरभाई विनूभाई पटेल या एकाच आरोपीचे प्रत्यार्पण केले आहे. त्यांनतर एकही फरारीला त्यांनी भारताला सोपवले नाही. भारताने दोन फरारींना ब्रिटनला सोपवले आहे.

त्याचप्रमाणे गुलशनकुमार हत्याकांडातील आरोपी नदीम-श्रवण ब्रिटनमध्ये शरण गेले होते. त्यांना भारताला सोपवण्याची मागणी ब्रिटनने फेटाळून लावली होती. याशिवाय ब्रिटनमध्ये अनेक भारतीय नागरिक असल्यामुळे फरारी लोकांना तिथेही आपल्यासारख्याच वातावरणातील राहणी.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *