‘पुढून,मागून कसंही बघितला तरी हा गडी पैलवान दिसत नाही’

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणीच विरोधक नाही.

या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला. सोलापूरमधील बार्शीत पवारांनी शनिवारी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली.

मुख्यमंत्र्यांनी आज पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हंटल, ‘खरा पैलवान कोण? हे जनता 24 ऑक्टोबरला दाखवून देईल. तसेच आम्ही काही नटरंग नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही. तसेच ते आम्हाला शोभतही नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे शरद पवार यांची मानसिकता ढासळी आहे. त्यामुळे ते हातवारे करत आहेत’ जळगावात आज ते बोलत होते.

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये चाललेल्या या वाकयुद्धात आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उडी घेतली आहे. ते अहमदनगर येथे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

यावेळी फडणवीस यांच्यावर टीका करताना कोल्हे म्हणाले पुढून,मागून कसंही पाहिलं तरी हा गडी पैलवान काय वाटतं नाही. ते पुढे म्हणाले, ‘जर समोर पैलवान नसतील देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याठिकाणी आखाडा खणायला येतायेत का? लहानपणी आमच्यावर संस्कार होते. जर मुलगा परिक्षेत नापास झालं तर बापाला घेऊन यावं लागतं, आता ते तुम्ही समजा काय झालं.’

भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चालू असलेल्या या वाकयुद्धाने निवडणुकीचे वातावरण चांगलेच गरम होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या ८ दिवसांनी मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी होईल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *