नवीन घेतलेल्या गाडीची हेडलाईट दिवसा पण का चालू असते आणि कसा झाला फायदा ?

२०१७ मध्ये नवीन नियमानुसार बीएस ३ हे इंजिन असलेल्या वाहनाची विक्री सरकारने बंद केली आणि बीएस ४ हे इंजिन नवीन गाड्यांना लावण्यात आले आहे. या नवीन इंजिनचा एक वैशिष्ट हे हि आहे कि यामध्ये गाडी सुरु केली कि लाईट देखील सुरु होतो. पहिले फक्त बटन दाबल्यावरच लाईट सुरु होत असे.

१ एप्रिल २०१७ पासून बीएस ३ इंजिन असलेल्या गाड्यांची विक्री आणि उत्पादन बंद करण्यात आले याच्या मागचे कारण असे होते कि बीएस ३ इंजिन मुळे जास्त प्रदूषण होते. आता नवीन वाहनांना ऑटोमेटीक हेड लाईट सिस्टीम आहे आपल्याला हेड लाईट बंद करता येत नाही.

त्यामुळे आता कुठल्या बाईक अथवा कारचा हेडलाईट सुरु असेल तर हात गोल गोल फिरवून आपल्या गाडीचा लाईट सुरु आहे हे सांगण्याची पद्धत देखील बंद झाली आहे. अनेक लोकांना हे फिचर पसंदीस नाही आले परंतु या मागचे कारण काय आहे याचा कधी विचार केला का ?

या मागचे मुख्य एक कारण आहे जेव्हा धूळ, पाउस, धुक इत्यादी असल्यास वाहन चालक समोर येणारे वाहन बघू शकतो. किंवा ट्राफिक नसल्यास आपल्या समोरून दुसरे वाहन येत असल्यास पुढील चालक वाहनाच्या हेडलाईट मुळे सतर्क होतो. या मुळे अपघाताची संख्या कमी झाली आहे.

आणि आपल्याला हे माहिती करणे आवश्यक आहे कि यामुळे वाहनावर काही विपरीत परिणाम होत नाही. आणि हा निर्णय सरकारने घेतलेला नसून वाहन चालक कंपनीने स्वतः घेतलेला आहे. युरोपियन देशात टाइम रनिंग लाइट्स (TRL) हा नियम २००७ पासून लागू आहे.

इटली, हंगरी, रोमानिया, बुल्गारिया, चेक गणराज्य, एस्टोनिया, कोसोवो, लातविया, लिथुआनिया, मैसेडोनिया, मोंटेनेग्रो, पोलैंड तसेच कॅनडा, अमेरिका आणी ब्रिटन मध्ये देखील हा नियम लागू आहे.

असा झाला फायदा

२०१५ मध्ये वाहन अपघातात अपघातांची संख्या ५,०१,४२३ एवढी होती यामध्ये ३३.८% अपघात बाईक, जिप आणि taxi च्या अपघाताची संख्या २३.६ टक्के आणि इतर वाहनांची २१% एवढी आहे आणि या सर्वा मध्ये मृतांची संख्या हि बाईक वाल्यांची जास्त आहे. तर आता नवीन लाईट सिस्टीम मुळे अपघातांची एका वर्षाची संख्या ४,८०,७५२ एवढी आहे. दरवर्षी वाढत जाणारा हा आकडा कमी होत चालला आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *