भारतात पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकिच का असतो ? वाचा खासरे कारण

हा प्रश्न कदाचित परदेशी सिनेमा बघितल्यावर मनात येईल कारण इतर देशात पोलीस वर्दीचा रंग हा बहुतेक ठिकाणी काळा असतो. परंतु भारतात पोलीस वर्दीचा रंग फक्त खाकी असतो. प्रत्येक देशात पोलीस तुकडी आहे आणि त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. सण उस्तव सगळ्या वेळेस हे आपल्या संरक्षण आणि कायदा सुव्यवस्था राखायला तत्पर असतात.

भारतात काही ठिकाणी हलका खाकी तर काही ठिकाणी गर्द खाकी असा रंग आपणास दिसतो. कोणीही दुरून बघितल्यावर आरामात सांगू शकेल कि हा पोलीसवाला आहे. भारतावर जेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते तेव्हा पोलीस पांढरी वर्दी परिधान करत असे. परंतु ड्युटी लांब असल्यास हि वर्दी लवकरच घाण होत असे.

आपली वर्दी लवकर घाण व्हावी नाही यासाठी शिपायांनी वेगवेगळी नीळ वापरायला सुरवात केली. यामुळे पोलिसांचा दल हा एक समान वाटत नव्हता, हे बघून अधिकाऱ्यांनी एक खाकी रंगाची डाय तयार केली. खाकी रंग हा हलका पिवळा आणि राखडी रंग या रंगा पासून खाकी रंग तयार झाला आहे.

हा रंग बनविण्यासाठी चहाच्या पत्तीचे पाणी वापरले आणि तेव्हापासून पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी झाला. खाकीचा हिंदीत अर्थ खराब मातीचा रंग असा होतो. या खाकी रंगामुळे पोलिसांच्या वर्दीवर येणारे माती, पाणी, चहा इत्यादीचे डाग दिसत नव्हते.

इसविसन १९४७ मध्ये हैरी लम्सडेन (sir Harry Lumsden) यांनी खाकी रंग पोलीसा करिता अधिकृत रंग म्हणून स्वीकारला. आणि तेव्हापासून भारतीय पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी झाला. सर हैरी लम्सडेन यांनी खाकीच कसा निवडला याच्या पाठीमागे देखील अनेक करणे आहेत.

BPRD (Bureau of Police Research and Development) नुसार १८२९ मध्ये लंडन मेट्रोपोलिटन पोलीस यांनी सर्वप्रथम १८२९ मध्ये डार्क ब्लू रंगाची वर्दी तयार केली होती. हा निळा रंग यासठी निवडला कारण त्यावेळेस ब्रीटीश आर्मी हि लाल आणि पांढरा रंगाची वर्दी वापरत असे. त्यामुळे दोघात फरक दिसण्यासाठी हा रंग निवडण्यात आला होता. त्यानंतर १८४५ मध्ये अमेरिकेत पहिली आधुनिक पोलीस फोर्स तयार झाली.

लंडन पोलीसा प्रमाणे त्यांनी देखील डार्क ब्लू रंगाची वर्दी ठेवली होती. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाल info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *