हा आहे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्ती आहे कोटींच्या घरात

निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सध्या नेत्यांच्या संपत्तीच्या चर्चा सर्वत्र जोरदार रंगत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवार आपले शपथपत्र दाखल करतात. त्यामधुन उमेदवाराची संपत्ती बाहेर येते. या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चर्चा आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीची झाली. कारण यापूर्वी ठाकरे कुटुंबातील कोणत्याच सदस्याने निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील सदस्याची संपत्ती पहिल्यांदाच बाहेर येणार होती.

आदित्य यांच्यानंतर सर्वात श्रीमंत उमेदवार कोण म्हणून देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या संबंधी माहिती आपणास या निवडणुकीच्या काळात कळते. याच माध्यमातून कोण नेता किती श्रीमंत आहे, याचा अंदाज देखील नागरिकांना येतो.

सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून या निवडणुकीत मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती झालेले मंगल प्रभात लोढा यांच्याकडे बघितले जात होते. त्यांची संपत्ती बघून अनेकांना धडकी भरेल हे नक्की आहे. तर मंगल प्रभात लोढा हे मुंबईतील मलबार हिलचे भाजप आमदार आहे. मागे आलेल्या देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत देखील मंगल प्रभात लोढा यांचे नाव आले होते.

1995 पासून ते सलग पाच वेळा भाजपच्या तिकीटावर आमदारपदी निवडून येत आहेत. ग्रोह हुरुन ही संस्था देशातील १०० श्रीमंत बांधकाम व्यवसायिकांची यादी प्रसिद्ध करते. या यादीत मंगल लोढांनी पहिला क्रमांक पटकावला होता. लोढा यांच्या फर्म कडे तब्बल २७ हजार १५० कोटींची संपत्ती असून गेल्या वर्षी याच यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते.

पण मंगलप्रभात लोढा यांनी स्वतःची एकूण ४४१ कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. या संपत्तीशिवाय त्यांच्यावर २८३ कोटींचं कर्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली. मंगलप्रभात लोढा यांना देखील एका भाजपच्याच उमेदवाराने संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे.

कोण आहे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार-

माजी मंत्री प्रकाश महेता यांच्याऐवजी घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले बांधकाम व्यावसायिक पराग शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ५००.६२ संपत्ती जाहीर केली.

शहा यांच्याकडे घाटकोपरात चेंबूर येथे ३ फ्लॅट आणि ठाण्यात ५७१० चौरस फुटांचा बंगला आहे. ज्याची प्रत्येकी किंमत १५ कोटी रुपये आहे. तर चेंबूरमधील तीन फ्लॅटची किंमत २५ कोटी आहे. शहा दाम्पत्याच्या नावावर तब्बल २९९ कोटींचे शेअर्सअसून महाराष्ट्र व गुजरातमध्ये त्यांच्या नावे शेतजमीन आहे.

याशिवाय त्यांच्याकडे २ कोटी ६ लाखांचे दागिने स्कोडा कार, पत्नीच्या नावे २ कोटी ४७ लाखांची फरारी गाडी तर ३.४५ कोटी रुपयांचे दागिने आहेत. शहा यांच्यानंतर संपत्तीच्या बाबतीत भाजपचे मुंबईचे अध्यक्ष व मलबार हिल मतदारसंघातील उमेदवार मंगल प्रभात लोढा ४४१ कोटींच्या मालमत्तेसह दुसºया तर मानखुर्द -शिवाजीनगर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी २०९ कोटींच्या संपत्तीसह तिसºया क्रमांकावर आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *