भारतातील असे ६ ठिकाण जिथे भारतीयांना प्रवेश नाही..

बातमीचे शीर्षक वाचल्यावर कोणालाही धक्का बसेल कि भारतात असेही ठिकाण आहे जिथे भारतीयांना प्रवेश नाही ? हो असे ठिकाण आहे भारतात जिथे भारतीय नागरिकास प्रवेश मिळत नाही. या ठिकाणी विदेशी नागरिकांना प्रवेश मिळतो परंतु भारतातील नागरिकांना नाही आणि या ठिकाणाचे मालक भारतीयच आहे.

उत्तर आणि उत्तर पूर्व भारत मध्ये असे अनेक ठिकाण आहे जिथे भारतीयांना प्रवेश घेण्यासाठी विशेष परमीट घ्यावा लागतो. इथे प्रवेशास सरकार कडून परमीट किंवा इनर लाइन परमिटची आवश्यकता असते.

हिमाचल प्रदेश मध्ये एक इज्रायली कॅफे आहे त्या कॅफेचे नाव फ्री कसोल कॅफे असे आहे. २०१५ मध्ये हा कॅफे प्रसिद्ध झाला कारण या कॅफेनि भारतीय नागरिकास प्रवेशाकरिता पासपोर्ट मागायला सुरवात केली होती विना पासपोर्ट या कॅफेनि आपणास सेवा देण्यास नकार देण्यात येत होता.

चेन्नई मध्ये देखील असे एक लॉज आहे या लॉजचे नाव हाइलैंड लॉज असे आहे आणि इथे फक्त विदेशी नागरिकांना प्रवेश आहे. इथे तोच भारतीय थांबू शकतो ज्याच्याकडे दुसऱ्या देशाचा पासपोर्ट आहे. सोबतच चेन्नई येथील रेड लॉलीपॉप होस्टेल येथे फक्त विदेशी नागरिकांना प्रवेश दिला जातो.

दुसऱ्या भागात बघितले तर उत्तर सेंटिनल बेट हे बेट अंदमानचा एक हिस्सा आहे या बेटावर “सेंटीनिलिज” नावाची आदिवासी जमात राहते. हे बेट भारतात असून इथे भारताची चालत नाही स्थानिक आदिवासी लोक इथे कोणालाही प्रवेश देत नाही. २००४ मध्ये सुनामी आल्यावर इथे मदत कार्य पोहचवायला भारताच्या लष्कराने प्रयत्न केले परंतु आदिवासी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.

अश्याच प्रकारचे हिमाचल प्रदेश मध्ये एक मलाना नावाचे गाव आहे. इथे राहणारे लोक हे अलेक्जेंडर राजाचे जे जखमी सैनिक होते त्यांचे वंशज आहे. या गावातील लोक बाहेरील कोणालाही प्रवेश देत नाही. त्यांच्या वस्तू किंवा किंवा कुठलीही वस्तू येथून बाहेर जात नाही. या क्षेत्राचा आर्थिक स्त्रोत मलाना जलविद्युत स्टेशन हा एकमेव आहे.

भारतात काही समुद्र काठ असेही आहे जिथे भारतीयांना प्रवेश नाही आहे. गोवा आणि पोन्डेचेरी मध्ये काही बीच हे फक्त विदेशी पर्यटकासाठी आरक्षित आहेत. भारतातील काही ठिकाणी तर विदेशी आणि भारतीय दोघानाही प्रवेश करण्यासाठी परमीट घ्यावा लागतो.

लक्षदीप बेटावर अगाती, कदमत आणि बांगरम या ठिकाणी फक्त परदेशी पर्यटकाना प्रवेश आहे आणि मिनिकॉय आणि अमिनी या बेटावर फक्त भारतीयांना जाण्यास परवानगी आहे. आपल्याला हि माहिती वाचून आश्चर्य नक्की वाटले असेल.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *