कार्यकर्त्याने दसऱ्याला घेतलेली नवी कोरी कार राज ठाकरे स्वतः चालवतात तेव्हा!

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळं प्रचाराला वेग आला आहे. यावेळेस महायुती आणि आघाडी झाल्याने प्रचारात अधिकच रंगत येत आहे. तर लोकसभा निवडणुकीपासून दूर असलेल्या मनसेनेही निवडणुकीत उडी घेतल्याने अधिकच रंगत येणार आहे. राज ठाकरे काल पुण्यात आपल्या प्रचारसभेचा नारळ फोडणार होते.

पण पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सभा रद्द करावी लागली. त्यापूर्वी राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदान आयोजकांना मिळत नव्हते. नंतर मैदान मिळाले पण पावसाने सभेत अडथळा आणला. राज ठाकरे हे दसऱ्यालाच पुण्यात आले होते. त्यांच्या हस्ते प्रचार कार्यालयांचे उदघाटन पार पडले. दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर त्यांनी मनसेचे काेथरुडचे उमेदवार किशाेर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घान केले.

राज ठाकरे यांचे तरुणांमध्ये प्रचंड क्रेज असल्याचे आपण यापूर्वी अनेकदा बघितलं आहे. त्यात मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरे हे त्यांचे श्रद्धास्थान. त्यांचं कार्यकर्त्यांसोबत एक वेगळंच नातं आहे. राज ठाकरेंचं प्रेम अनुभवण्याचा अनुभव पुण्यातील एका कार्यकर्त्याला दसऱ्याला आला. मनसेच्या एका कार्यकर्त्यांने दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी कार घेतली.

दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपाध्यक्ष सचिन ननावरे याने नवी कार घेतली हाेती. त्या कारचे उद्घाटन राज ठाकरे यांनी करावे अशी त्याची इच्छा हाेती. तशी विनंती देखील त्याने राज ठाकरेंना केली. राज ठाकरे यांनी देखील हि विनंती स्वीकारली आणि त्याच्या विनंतीचा मान ठेवत ठाकरे यांनी त्याला गाडी घेऊन त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी येण्यास सांगितले.

काल सकाळी सचिन आपली गाडी घेऊन त्यांच्या निवासस्थानी पोहचला. राज ठाकरे यांनी अगदी हटके पद्धतीने त्याच्या गाडीचे उद्घाटन केले. राज ठाकरे सचिनच्या नव्या गाडीचे सारथी बनले. सचिनची नवी गाडी चालवत त्याला राज यांनी शुभेच्छा दिल्या. एका सामान्य कार्यकर्त्याचा मान राखत ठाकरेंनी गाडी चालविल्याने ननावरे याला अत्यंत आनंद झाला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *