आदित्य ठाकरे विरुद्ध निवडणूक लढविणाऱ्या अभिजित बिचुकलेची संपत्ती एकदा बघाच..

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदार संघातून निवडणूक लढवत असेलेले कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांच्या पेक्षा त्यांची पत्नी अलंकृता या श्रीमंत आहेत. प्रतिज्ञापत्रातून ही माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, अभिजीत बिचुकले साताऱ्यातूनही विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात बिचुकलेंनी अर्ज दाखल केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या उदयनराजेंविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहे.

साताऱ्यात अभिजीत बिचुकलेचा जन्म झाला त्यांच्या घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा पारंपरिक व्यवसाय आहे. बिचुकले सातारा नगरपालिकेचे कर्मचारी होते. पण, सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला. बिचुकले यांनी उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन करून आपला उदरनिर्वाह करत होते.

प्रत्येक निवडणुकीत ते उमेदवारी जाहीर करतात. उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली. मात्र, दोन हजार मतंही त्यांना मिळाली नाहीत. यंदा त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता. बिचुकलेंवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत असे त्यांनी शपथ पत्रात नमूद केले आहे.

बिचुकले यांनी आपली एकूण संपत्ती केवळ ७८ हजार ५०३ रुपये इतकी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी अलंकृता यांच्या नावावर बिचुकलेंपेक्षा चौपटीहून अधिक असल्याचे दिसत आहे. अलंकृता यांच्या नावावर ३ लाख ६६ हजार ८१८ रुपये आहेत असं बिचुकलेंनी स्पष्ट केलं आहे.

बिचुकले यांनी आपल्याकडे दागिने, मोटार, पॉलिसी असे काहीही नसल्याचे म्हटले आहे. ७५ हजार रुपयांची रोख रक्कम असून, याशिवाय तीन बँकांमध्ये ३ हजार ५०३ रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपली एकूण संपत्ती ७८ हजार ५०३ एवढी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे पत्नी अलंकृता यांच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम, बँक खात्यांमधील रक्कम, पॉलिसी, दुचाकी, सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण ३ लाख २६ हजार ८१८ रुपयांची मालमत्ता आहे असं या प्रतिज्ञापत्रात बिचुकलेंनी स्पष्ट केलं आहे. अलंकृता यांच्या नावावर ८० हजारांची दुचाकी आणि ९० हजार किंमतीचे तीन तोळे सोने आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *