कोथरूडनंतर राष्ट्रवादीने आणखी एका ठिकाणी उमेदवारी वापस घेत राष्ट्रवादीने दिला मनसेला पाठिंबा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय वर्तुळात रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. नाशिक पूर्व मतदारसंघात कोथरूड पॅटर्नची पुनरावृत्ती झाली होती. याठिकाणी मनसेचे अधिकृत उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली असून राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानप यांना पाठींबा दिला आहे.

पालघरमधून अमित घोडा यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं होतं पण त्यांनी माघार घेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुहास देसाई यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे याचा फायदा मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना होणार असल्याचं चित्र आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसे यांच्यात अधिकृत युती जाहीर झाली नसली तरी काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी एकमेकांना पुरक असलेली भूमिका घेतल्याने मनसे-राष्ट्रवादीत छुपी युती झाल्याचं पाहायला मिळत आहे.

यापूर्वी कोथरूडमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. याठिकाणी विरोधकांकडून एकमताने मनसेच्या किशोर शिंदे यांच्या पाठिशी ताकद उभी करण्यात आली आहे. यंदा कोथरूडमध्ये भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रिंगणात उतरले आहेत. मात्र, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे कोथरूडमध्ये ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाला आहे.

ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास सुर्यकांत देसाई यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा ठामपातील गटनेते नजीब मुल्ला यांनी दिली आहे. दरम्यान, आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षहीत पाहून हा निर्णय घेतलेला असल्याने आपण आपला निवडणूक अर्ज मागे घेत असल्याचे सुहास देसाई यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार मागे घेतल्याने याठिकाणी मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपाचे संजय केळकर यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. त्यात विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडू नये अशी काळजी मनसे-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *