महाराष्ट्राचे आजपर्यंतचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर वाचा ही राजकीय आत्मचरित्रे

राजकारण हा महाराष्ट्रातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी पारावरच्या गप्पांपासून ते ऑफिस, प्रवास, टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमांमध्ये राजकारणाचा विषय चवीने चघळला जातो. ज्याला राजकारणातले किस्से, घडामोडी माहित असतात त्याच्या अवतीभवती नेहमी श्रोत्यांचा गराडा असतो. अशा राजकीय विश्लेषकांना निवडणुकीच्या काळात तर खूप किंमत प्राप्त होते.

आपल्याला राजकारणातील ज्या गोष्टी माहित नसतात, त्या गोष्टी या राजकीय विश्लेषकांना माहित असल्याचे पाहून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. पण तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर आम्ही अशी काही राजकीय आत्मचरित्राची नावे सांगणार आहोत, जी वाचल्यास तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण चौकात समजून जाईल…

महाराष्ट्राचे राजकारण समजावणारी राजकीय आत्मचरित्रे

यशवंतराव चव्हाण (कृष्णाकाठ),
(मी एस. एम.), प्र. के. अत्रे (कऱ्हेचे पाणी), शांताबाई दाणी (रात्रंदिन आम्हां), गोदावरी परुळेकर (जेव्हा माणूस जागा होतो), बी. जे. खताळ (अंतरीचे धावे), मोहन धारिया (संघर्षमय सफर),

जी. डी. बापू लाड (एक संघर्ष यात्रा), भाऊसाहेब थोरात (अमृतमंथन), दत्ता देशमुख (मी दतूचा दत्ता झालो त्याची गोष्ट), मधु दंडवते (जीवनाशी संवाद), ग. प्र. प्रधान(माझी वाटचाल), सा. रे. पाटील (सा. रे. पाटील बोलतोय)

शरद पवार (लोक माझे सांगाती), शरद जोशी (अंगारमळा), उषा डांगे (पण ऐकतं कोण ?), कमल देसाई (जय हो !), शंकरराव काळे (समाज अभियंता), शंकरराव कोल्हे (सत्याग्रही शेतकरी), यशवंतराव गडाख (अर्धविराम),

राम नाईक (चरैवेति चरैवेति), राजू शेट्टी (शिवार ते संसद), सुभाष देसाई (सुभाष देसाई !), नारायण राणे (नो होल्ड्स बार्ड), मधू लिमये (आत्मकथा), इत्यादि. ही आत्मचरित्रे तुम्हाला महाराष्ट्राचे स्जकरण समजून घ्यायला मदत करतील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *