नेत्याच्या संपत्तीमध्ये दुपटीने वाढ होताना या आमदाराची संपत्ती झाली निम्याने कमी..

महाराष्ट्रातील राजकारणात असे बोटावर मोजणारे आमदार आहेत ज्यांची संपत्ती लाखाच्या घरात आहे आणि आमदाराचे नुकसान होताना फार कमी वेळा आपण बघितले असेल. परंतु २०१४च्या निवडणुकीपेक्षा तब्बल निम्याने संपत्ती कमी झालेल्या आमदार बघितला का ?

महाराष्ट्राच्या राजकारणाची माहिती असणार्या लोकांना छगन भुजबळ हे नाव माहिती नाही असे होऊच शकत नाही. मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण ते १९८५ मध्ये त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड, महाराष्ट्राचे गृहमंत्री, महसूलमंत्री, २००४ पासून २०१४ पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री , गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५पर्यंत मंत्री, १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्री इत्यादी पदे त्यांनी उपभोगली आहे.

२०१४ साली छगन भुजबळ यांच्या कडे २१ कोटी ९१ लाख २९ हजार ४९५ रुपये एवढी संपत्ती होती. यामध्ये ४ लाख नगद आणि बँकमध्ये २० लाख एफडी इत्यादी स्वरुपात पैसे जमा होते. विविध कंपन्यात त्यांची गुंतवणूक २७ लाख रुपये एवढी होती. ५० लाखाचे सोने, ५ करोड रुपयाची शेतजमीन, ५ करोड रुपयाचे व्यावसायिक जमीन, ४ करोड २५ लाखाचा बंगला आणि ४ करोड रुपयाचा flat इत्यादी अशी संपत्ती छगन भुजबळ यांच्या कडे होती.

२०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांभोवतीचा फास आवळला जाऊ लागला. त्यांना मार्च २०१६ मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली. त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नाही.

भुजबळांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली होती. सगळं जप्त केलं, फक्त मफलर ठेवली, पण लोकांचं प्रेम जप्त करु शकले नाही, असं भुजबळ नेहमी सांगतात. पण त्यांच्याकडे सध्याही कोट्यवधींची संपत्ती आहे परंतु मागील निवडणुकीपेक्षा हि संपत्ती कमी आहे.

२०१९ च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या वैयक्तित संपत्ती मध्ये कमी झालेली दिसत आहे. स्थावर मालमत्तेत सध्याच्या बाजारमूल्यानुसार विविध प्लॉट, फ्लॅट यासह एकूण मालमत्ता १० कोटी ३८ लाख ९४ हजार रुपये आहे व त्यांच्यावर ३८ लाख २४ हजाराचे कर्ज देखील आहेत. भुजबळांकडे हातात रोख रक्कम फक्त १ लाख ३ हजार तर पत्नीकडे ५१ हजार ७०० रुपये आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *