मेट्रो कारशेड म्हणजे नक्की काय असते ?

मागच्या काही दिवसांपासून आपण मुंबईच्या गोरेगाव भागातील आरे दूध वसाहतीमधील वृक्ष तोडण्यासंदर्भातील वाद वर्तमानपत्रात किंवा न्यूज चॅनेलवर वाचला असेल. अनेक पर्यावरणप्रेमी व्यक्तींनी या नियोजित या वृक्षतोडीला विरोध केला आहे.

परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर मुंबई मेट्रो प्रशासनाने काल रात्री पासून आरे कॉलनीतील वृक्षतोड करायला सुरुवात केली आहे. सदर भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींची धरपकड केली जात आहे. हे सगळं चाललं आहे मेट्रो कारशेड उभारणीसाठी ! पण कारशेड म्हणजे नेमकं असतं तरी काय ?

कारशेड म्हणजे नेमकं काय असतं ?

कारशेड या शब्दाचा शब्दशः अर्थ गाडीचे छप्पर असा असला तरी रेल्वेच्या किंवा मेट्रोच्या भाषेत कारशेड ही व्यापक संकल्पना आहे. मेट्रो कारशेड म्हणजे फक्त मेट्रो गाड्यांच्या पार्किंगसाठी उभे केलेले छप्पर नाही, तर गाड्यांच्या पार्किंगसोबतच त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे ते एक महत्वाचे केंद्र असते.

एकप्रकारे ही एक स्वयंचलित यंत्रणा असून याठिकाणी गाड्यांच्या साफसफाई, दुरुस्ती, तेलपाणी, इंजिन तपासण्या केल्या जातात. तसेच आपत्तीजनक परिस्थिती गाड्या इथे आणून सुरक्षितरित्या ठेवल्या जातात.

विरोध नेमका कशाला ?

मुळात आरे परिसरात मेट्रो कारशेड करण्यास पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध केला असला तरी त्यांचा विरोध मेट्रोला नसून त्यासाठी आरे परिसरात जी वृक्षतोड केली जाणार आहे त्याला आहे. गेल्या अनेक काळापासून गोरेगाव परिसरातील आरे दूध वसाहतीच्या परिसरातील जंगल “मुंबईचे काळीज” म्हणून ओळखले जाते. शहरात अशी झाडे इतरत्र जास्त नाहीत.

विकासासाठी पर्यावरणाचा बळी कशासाठी असा पर्यावरणवाद्यांचा प्रश्न आहे. शहरातील ट्रॅफिकच्या प्रश्नावर मेट्रो हा चांगला मार्ग असला तरी मेट्रो कारशेडसाठी इतर जागेचा विचार व्हावा असे त्यांचे म्हणणे आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *