गुजरात पॅटर्नमुळे या वीस आमदारांचे आणि ५ मंत्र्याचे भाजपने कापले तिकीट…

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मदत संपली आहे. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होत होती. यादीत कुणाचे नाव असेल याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. यामध्ये सर्वात जास्त आश्चर्याचा प्रश्न राहिला तो म्हणजे भाजपने त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना कुठल्याच उमेदवार यादीत स्थान कसे काय दिले नाही ? फडणीसांच्या मनात नेमकं चाललंय काय ? फडणवीस गुजरात पॅटर्न तर राबवत नाहीत ना ?

काय होता गुजरात पॅटर्न ?

देशाचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातमध्ये राबवलेली राजकीय रणनीती “गुजरात पॅटर्न” म्हणुन ओळखला जातो. मोदींनी १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणुन कारभार पाहताना अमित शहांच्या मदतीने गुजरातच्या संपूर्ण राजकारणावर आपली पकड ठेवली होती.

२०१४ मध्ये मोदी देशाचे प्रधानमंत्री बनले आणि मागोमाग त्यांनी अमित शहांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले. पण गुजरातचे राजकारण त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षातीलच प्रतिस्पर्धी अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांची तिकिटे कापली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हाच पॅटर्न वापरताना त्यांनी देशातील १०२ विद्यमान खासदारांची तिकिटे कापली होती. काही ज्येष्ठ नेत्यांना पक्ष सल्लागार समितीत जबाबदारी देण्यात आली होती.

फडणीसांचा गुजरात पॅटर्न

महाराष्ट्राच्या २०१९ विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करत असताना फडणवीसांनी देखील गुजरात पॅटर्नचाच अवलंब केल्याचे पाहायला मिळते. ज्या नेत्यांनी भाजप पक्ष महाराष्ट्रात वाढवला, रुजवला आणि तळागाळात नेला अशा नेत्यांनाही त्यांनी डच्चू दिला आहे.

चक्क ५ आजी माजी मंत्री आणि २० विद्यमान आमदारांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळे या आजीमाजी मंत्र्यांचा समावेश आहे. तर उदेसिंह पाडवी, सुधाकर कोहळे, राजू तोडसाम, मेधा कुलकर्णी, विजय काळे, आर. टी. देशमुख, सरदार तारासिंह, विष्णू सावरा, संगीता ठोंबरे, सुधाकर भालेराव, राजेंद्र नजरधने, बाळा काशीवार, चरण वाघमारे, बाळासाहेब सानप, प्रभूदास भिलावलेकर, राज पुरोहित, विजय काळे या आमदारांचा समावेश आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *