सरकारी नोकरी अर्जाच्या फी मधून सरकार करते एवढ्या कोटींची कमाई, काय लॉजिक आहे राव?

व्हाट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये केवळ गुड मॉर्निंग, गुडनाईट आणि छान छान सुविचारच फॉरवर्ड केले जातात असा जर आपला समज असेल तर एकदा आपल्या व्हाट्सअपवरील सगळे ग्रुप्स बारकाईने तपासा. जगाच्या पाठीवर नॉलेज आणि तत्वज्ञान देणाऱ्यांची कमतरता जाणवणार नाही. शाळा कॉलेज किंवा गावच्या पारावर बसून जे शिकायला मिळणार नाही ते इथे शिकायला भेटते.

व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मधील एका वर्गामध्ये असाच एक प्रबोधनपर संदेश वाचायला मिळाला. सरकारी नोकरी अर्जाच्या फी मधून किती कोटींची कमाई केली जाते याबद्दल सविस्तर अशी माहिती त्यात देण्यात आली आहे.

काय आहे हे लॉजिक ?

कोणत्याही सरकारी विभागात नोकरीची जाहिरात निघते तेव्हा त्या जाहिरातीच्या माध्यमातून सरकारला विद्यार्थ्यांना रोजगार द्यायचा आहे की त्यांच्याकडून पैसा कमवायचा असतो हे अजुनही समजले नाही. त्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया.

“समजा सरकारने एखाद्या पदासाठी १०० जागांची जाहिरात काढली आहे. या जागेसाठी देशभरातून जवळपास २५ ते ३० लाख विद्यार्थी अर्ज भरतात. अर्जासाठी साधारणपणे ५०० रुपये फी आकारली जाते. (३० लाख x ५०० रुपये = १५० कोटी रुपये).

सरकारची कमाई किती ?

सरकारला १०० जणांना नोकरी द्यायची आहे. समजा प्रत्येकी २५००० रुपये पगार ठरला आहे. त्यांचा एका महिन्याचा पगार (१०० x २५००० रुपये = २५ लाख रुपये) एवढा होईल. त्यांचा एका वर्षाचा पगार (२५ लाख x १२ = ३ कोटी रुपये) एवढा होईल. साधारणपणे ४० वर्षांचा सरकारी नोकरीचा काळ पकडल्यास (३ कोटी x ४० = १२० कोटी रुपये) एवढा पैसा पगारावर खर्च होईल.

आता (फी च्या माध्यमातून जमा झालेला पैसा १५० कोटी – पगारावर खर्च होणारा पैसा १२० कोटी = ३० कोटी रुपये) एवढी रक्कम सरकारला शिल्लक राहते. त्यातून अजून ५ कोटी रुपये परीक्षा, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, इत्यादि गोष्टींसाठी वजा केले तर १०० जागांच्या एका नोकरभरतीत सरकारला २५ कोटी रुपयांचा नफा होतो. सरकार वर्षभरात अशा अनेक प्रकारच्या परीक्षा घेते. मग तुम्हीच विचार करा, सरकार रोजगार देते की पैसे कमावते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *