भाजपची उमेदवारी मिळालेली हि महिला आहे टिकटॉक स्टार, बघा व्हायरल व्हिडीओ

विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. महाराष्ट्रासह हरियाणात विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सध्या सर्वत्र उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु आहे. उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

हरियाणात देखील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजपने उमेदवारी दिलेल्या एका महिला उमेदवाराचे टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. भाजपाकडून आमदपूर जागेवरून नेत्या सोनाली फोगाट यांना तिकीट देण्यात आलं आहे.

कोण आहेत सोनाली फोगट या टिकटॉक स्टार आहेत. भाजपकडून मंगळवारी हरियाणा विधानसभेसाठी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये त्यांना तिकीट जाहीर झालं आहे. सोनाली फोगट यांचे टिकटॉक व्हिडीओ हरियाणामध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्या त्यांच्या टिकटॉक चॅनेलला नेहमीच व्हिडीओ पोस्ट करत असतात.

सोनाली यांना टिकटॉकवर लाखो लोक फॉलो करतात. एवढेच नाही तर त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या फॉलोवर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यांना प्रचारासाठी याचा चांगलाच फायदा होणार असे चित्र आहे. सोनाली या भाजपच्या हरियाणा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष देखील आहेत.

त्यांच्यासमोर काँग्रेसच्या कुलदीप बिष्णोई यांचे आव्हान असणार आहे. सोनाली यांचे पती हे भाजपचे नेते होते. २०१७ मध्ये त्यांच्या पतीची हत्या झाली होती. त्यानंतर त्या भाजपमध्ये आल्या आणि सक्रिय झाल्या.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *