‘या’ कारणामुळे मनसे सोडुन नितीन नांदगावकर शिवसेनेत गेले

लोकसभा निवडणुकीपासून दूर राहिलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे चित्र हळू हळू स्पष्ट होत आहे. मनसेमध्ये मागील काही दिवसात चांगली इनकमिंग निवडणुकीच्या निमित्ताने होत असल्याचे दिसून येते. मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. राज ठाकरे चांगली मोर्चेबांधणी या निवडणुकीसाठी करत आहेत.

मनसेमध्ये इनकमिंग सुरु असताना राज ठाकरेंना एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एक महाराष्ट्र सैनिक जो आपल्या धडाकेबाज आंदोलनांनी संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला होता तो शिवसेनेत गेला आहे. मनसेचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आणि आपल्या मनसे स्टाईल खळ्ळ खट्याक आंदोलनांसाठी नेहमी चर्चेत राहणारे नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे.

नितीन नांदगावकर यांनी काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा सेना प्रवेश मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

या कारणामुळे केला सेनेत प्रवेश-

नितीन नांदगावकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांचे नाव पहिल्याच यादीत येईल अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र असे काही झाले नाही. पहिल्या यादीत त्यांचे नाव न आल्यानंतर दुसऱ्या यादीत त्यांना उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते पण दुसऱ्याही यादीत उमेदवारी जाहीर न झाल्याने ते नाराज झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. रात्रीच त्यांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश देखील उरकून टाकला.

कोण आहेत नितीन नांदगावकर-

नितीन नांदगावकर हे मनसेच्या वाहतूक सेनेचे राज्य सरचिटणिस होते. आपल्या धडाकेबाज आंदोलनांमुळे त्यांनी राज्यभरात आपली एक वेगळी ओळख बनवली होती. त्यांनी मुंबईत आजपर्यंत अनेक मराठी माणसांना न्याय मिळवून दिला आहे.

याशिवाय त्यांनी प्रवाशांची पिळवणूक करणाऱ्या अनेक टॅक्सीचालकांना धडा शिकवला आहे. नुकतंच त्यांनी टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या टॅक्सी चालकाविरोधात केलेले आंदोलन चांगलेच गाजले होते.

आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी आजपर्यंत अनेकांना न्याय मिळवून दिला होता. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *