अबब! आदित्य ठाकरे आहेत एवढ्या कोटींच्या संपत्तीचे मालक, बघून अवाक व्हाल

ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा कोणी निवडणूक रिंगणात युवासेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे उतरत आहे. वरळी विधानसभा मतदार संघातून त्यांनी आज अर्ज दाखल केला त्यांच्या सोबत आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे हे होते. या निवडणूक पत्रातून आदित्य यांची संपत्ती पुढे आलेली आहे. याच माध्यमातून कोण नेता किती श्रीमंत आहे, याचा अंदाज नागरिकांना येतो.

आदित्यला आता जनतेनेच स्वीकारले आहे : उद्धव ठाकरे

माझा मुलगा आहे म्हणून मी लादणार नाही. त्यांनी स्वीकारले तरच तू यशस्वी होशील, असे शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितले होते. आदित्यबाबतही माझे तेच मत हाेते. परंतु जनतेने त्याला स्वीकारले असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

आतापर्यंत कधीच निवडणुक लवढलेली नसल्याने त्यांच्या संपत्तीबद्दल आतापर्यंत केवळ अंदाजच व्यक्त केला जात होता. आदित्य ठाकरे कोट्यधीश असल्याचं समोर आलं आहे. संपत्तीचे विवरण देताना त्यांनी बँकेमध्ये १० कोटी ३६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स आहेत. साडे सहा लाखांची एक बीएमडब्लू बाईक आहे.

आदित्य यांनी आपल्याकडे ६४ लाख ६५ हजारांचे दागिने असून इतर संपत्ती एकूण १० लाख २२ हजारांची असल्याचे आदित्य यांनी सांगितले आहे. एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावावर आहे.

आदित्य ठाकरे यांचे वय सध्या २९ वर्ष आहे या वयात त्यांनी चांगली संपत्ती जमवली आहे. सदर संपत्ती हि आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे. आदित्य यांच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

त्यामुळे अनेकांना या निवडणुकीची उस्तुकता लागली आहे कि आदित्य ठाकरे ची इनिंग कशी असणार आणि निवडून आल्यावर कोणत्या पदावर त्यांची दावेदारी असणार यासाठी सर्वांनी नजरा आपल्या या मतदार संघाकडे वळविल्या आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *