कसोटीत पहिल्यांदाच सलामीला खेळताना रोहित शर्माने केले हे ३ मोठे विक्रम

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहितनं खणखणीत शतक झळकावलं. रोहित आणि मयांक हे प्रथमच सलामीवीर म्हणून खेळायला एकत्र आले होते.

आज अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला. रोहितने आपल्या खेळीत १७४ चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ११५ धावांची नाबाद खेळी केली आहे. त्याला युवा फलंदाज मयांक अग्रवालने देखील चांगली साथ दिली. मयांक हा ८४ धावांवर नाबाद आहे. आज अंधुक प्रकाशामुळे चहापानानंतरचा खेळ वाया गेला.

रोहित शर्मा हा कसोटीमध्ये म्हणावा तसा यशस्वी झाला नव्हता. रोहित हा कसोटीत ५ व्या किंवा ६ व्या स्थानावर खेळत असे. पण त्याला चांगले यश आले नाही. आज रोहित सलामीला कशी कामगीरी करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. रोहित सराव सामन्यात दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. आज मात्र त्याने जबरदस्त खेळी करत अनेक रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

रोहितने या सामन्यात केले ३ मोठे विक्रम –

रोहितनं सुरुवातीला संयमी आणि जम बसल्यावर आपल्या नेहमीच्या अंदाजात खेळ करताना चाहत्यांना खुश केलं. हिटमॅन रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून धडाकेबाज सुरुवात केली. रोहितने आज राहुल द्रविडच्या एका विक्रमाची बरोबरी केली. राहुल द्रविडने १९९८ मध्ये हा विक्रम केले होता. द्रविडने सलग ६ डावांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.

रोहितनं घरच्या मैदानावर कसोटीत सलग सहावेळा ५०+ धावा केल्या आहेत. त्यानं मागील सहा डावांत ८२, ५१*, १०२*, ६५, ५०*, ५९* आणि आज नाबाद ११५ धावा केल्या आहेत.

मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या फलंदाजांत रोहितनं अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानं मायदेशात ९१.२२ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. रोहितनंतर विजय हजारे (६९.५६), विराट कोहली ( ६४.६८), चेतेश्वर पुजारा ( ६१.८६) यांचा नंबर येतो. रोहितनं मायदेशात १५ डावांत ९ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करत ८२१+ धावा केल्या आहेत.

कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे. यापूर्वी शिखर धवन, लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांनी हि कामगिरी केली आहे.

या दोघांनी प्रथमच कसोटीमध्ये सलामीला येत इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीवीर म्हणून एकत्र खेळणाऱ्या या जोडीनं द्विशतकी भागीदारी केली. शतक झळकावणारी ही तिसरी भारतीय जोडी आहे. वीरेंद्र सेहवाग व राहुल द्रविड ( वि. पाकिस्तान) आणि मुरली विजय व शिखर धवन ( वि. ऑस्ट्रेलिया) यांनी प्रथमच एकत्र खेळताना द्विशतकी भागीदारी केली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *