मनसेची उमेदवारांची यादी जाहीर, बघा कोणत्या मतदारसंघात कोणाला मिळाली उमेदवारी..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. राज ठाकरे यांनी पाच ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं सांगितलं. किती उमेदवार लढणार हे लवकरच जाहीर करेन, रोज चार-पाच नावं जाहीर करेन, असं ते म्हणाले होते.

आज राज ठाकरे यांच्या मनसेनी त्यांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी (MNS candidates first list) जाहीर केली आहे. या यादीत एकूण 27 उमेदवारांचा समावेश आहे. मनसेने मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन केलं होतं. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

मनसेचे 27 उमेदवार

प्रमोद पाटील कल्याण ग्रामीण, प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम, अशोक मुर्तडक नाशिक पूर्व, संदीप देशपांडे माहिम, वसंत मोरे हडपसर, किशोर शिंदे कोथरुड, नितीन भोसले नाशिक मध्य, राजू उंबरकर – वणी, अविनाश जाधव ठाणे, नयन कदम मागाठाणे

अजय शिंदे कसबा पेठ पुणे, नरेंद्र धर्मा पाटील सिंदखेड, दिलीप दातीर नाशिक पश्चिम, योगेश शेवेरे इगतपुरी, कर्णबाळा दुनबळे चेंबूर, संजय तुर्डे कलिना, सुहास निम्हण शिवाजीनगर, गजानन काळे बेलापूर, अतुल बंदिले हिंगणघाट, प्रशांत नवगिरे तुळजापूर

राजेश वेरुणकर दहीसर, अरुण सुर्वे दिंडोशी, हेमंत कांबळे कांदिवली पूर्व, वीरेंद्र जाधव गोरेगाव, संदेश देसाई वर्सोवा, गणेश चुक्कल घाटकोपर पश्चिम, अखिल चित्रे- वांद्रे पूर्व

काही दिवसांपुर्वी विधानसभा निवडणूक लढायची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दुमत आहे अशी माहिती समोर आली होती. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा झाली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *