काँग्रेस-राष्ट्रवादीमधून आलेल्या या ‘८ आयारामांना’ जाहीर झाली भाजपची उमेदवारी

सोमवारी रात्री शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काल भाजपानं आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढणार असून, तर चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून निवडणुकींच्या रिंगणात उतरले आहेत.

या यादीत भाजपच्या १२ विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. तर ५२ विद्यमान आमदारांना पहिल्या यादीत तिकीट जाहीर झालं आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या यादीचे वैशिट्ये म्हणजे या यादीत मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांचे दुसरे पीए रमेश आडसकर यांना तेथील सध्याचे आमदार आर टी देशमुख यांचं तिकीट कापून संधी देण्यात आली आहे.

पहिल्या यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व दिसून येत असून त्यांच्या मर्जीतीलच अनेकांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत सध्याच्या मंत्रिमंडळातील सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंढे यांना तिकीट जाहीर झाले आहे.

भाजपच्या या यादीमध्ये आयारामांना तिकीट मिळते का नाही हे पाहणे औत्सुक्याचे होते. कारण मागील काही दिवसात काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज मंडळींची मेगाभरती झाली होती. या मेगाभरती झालेल्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीचे आश्वासन दिले होते. ते या यादीतून पूर्ण झालेले दिसत आहे.

या आयारामांना मिळाले भाजपचे तिकीट-

भाजपच्या पहिल्या यादीत १२ विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. तर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना तिकीट जाहीर झालेले नाहीये. पण या यादीत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना तिकीट जाहीर झाले आहे.

सोबतच भाजपच्या या यादीत राष्ट्रवादीमधून आलेल्या संदीप नाईक, राणा जगजितसिंह पाटील, काँग्रेसमधून आलेल्या हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, मदन भोसले, सुनील देशमुख, यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. जवळपास ८ आयात उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *