राज ठाकरेंची आणि शरद पवारांची ‘म्हणून’ झाली ईडी चौकशी, राज यांनी केला गौप्यस्फोट

सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली असून सेना-भाजपची युती देखील जवळपास निश्चित झाले आहे. लोकसभा निवडणुकीपासून दूर राहिलेली मनसे देखील या निवडणुकीत उतरणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंनी मुंबईत मेळावा घेतला. या मेळाव्याला सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. तसेच या मेळाव्यात मनसेत काही पक्षप्रवेष देखील झाले. राज ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक दिवसानंतर पत्रकारांना सामोरे गेले. त्यांची ईडी चौकशी झाल्यापासून काहीसे ते ऍक्टिव्ह नसल्याचे चित्र होते. याबद्दल देखील मी ५ ऑक्टोबरला जाहीर सभेत भाष्य करेल असे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. इतकंच नाही तर राज ठाकरेंनी आपली ईडी चौकशी का झाली, त्यामगचं कारणही सांगितलं आहे. त्यांनी यापूर्वीही सरकारवर गंभीर आरोप केले होते.

म्हणून झाली ईडी चौकशी-

राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले कि पवार कुटुंबीय आणि त्यांच्या चौकशीमागे भाजपचा राजकीय हेतू होता. “माझी आणि पवार कटुंबियांमागे ED चौकशी लावण्यामागे निवडणुकीत आपल्याला कुणी आर्थिक मदत करू नये हा उद्देश आहे. ईडीची चौकशी किंवा अन्य प्रकरणात चौकशा मागे लागल्यास उद्योगपती, देणगीदार त्यापक्षाशी संपर्क टाळतात. फोनही घेत नाहीत. त्यामुळे पक्षाला आर्थिक मदत मिळत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांची कोहिनुर मिल खरेदीप्रकरणी चौकशी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. यावेळी राज यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटले कि मनसे विधानसभा निवडणूक ताकतीने लढवणार असून याबद्दल लवकरच घोषणा केली जाईल.

EVM विरोधी आंदोलंनाचे काय?

राज ठाकरे यांनी EVM ला विरोध दर्शवण्यासाठी काही महिन्यापूर्वी देशभरातील मोठ्या नेत्यांची भेट घेतली होती. राज यांचा सर्व पक्षांना निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असा आग्रह होता. पण बाकीचे पक्ष या मताशी सहमत नव्हते. त्यामुळे आपण एकट्यानेच निवडणुकीवर बहिष्कार का टाकावा ? असा विचार करून निवडणूक लढवणार असल्याचे राज यांनी सांगितले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *