‘मी ब्लु फिल्म करत नाही’ म्हणताच सभागृहात हशा पिकला पण असे का म्हणाले राज ठाकरे?

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा राज्यातील राजकीय वातावरण गरम व्हायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने या निवडणुकीमध्ये काल घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपल्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. आज भाजप सेनेची पहिली यादी जाहीर होण्याची देखील शक्यता आहे.

शिवसेना भाजपचा जागावाटपाचा फॉर्मुला निश्चित झाला असून काही जागांवर त्यांची चर्चा चालू आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बाहेर राहिलेली मनसे विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आज वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये मसनेचा मेळावा झाला. यावेळी विविध पक्षातील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

या मेळाव्याला राज्यातील नेते आणि सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. या मेळाव्यात नाशिकचे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला. सोबतच यावेळी मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे वेळ आल्यावर सर्व स्पष्ट करू. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये कालपासून जोरदार इनकमिंग चालू झाली आहे. राज ठाकरे हे ५ ऑक्टोबरला पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यांनी यावेळी सांगितले कि एवढे दिवस का शांत होतो आणि पुढील जी काही भूमिका असणार आहे ती या सभेतच स्पष्ट करणार आहेत.

‘मी ब्लु फिल्म करत नाही’ म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला-

राज ठाकरेना एका पत्रकाराने प्रश्न विचारला कि ब्लु फिल्मच्या संदर्भात काय सांगाल. यावेळी राज ठाकरेंनी मिश्किलपणे ‘मी ब्लु फिल्म करत नाही’ असे सांगितले. त्यांनी असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. या पत्रकाराला ब्लु प्रिंट विषयी प्रश्न करायचा होता पण त्याने ब्लु फिल्म म्हणल्याने तिथे एकच हशा पिकला.

दरम्यान राज ठाकरे ५ तारखेला पहिली प्रचार सभा घेणार आहेत. इतके दिवस ते का बोलले नाहीत हे याच सभेत सांगणार आहेत. मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे काही आहे ते सांगेल असे ते म्हणाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *