पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख वाढली, वाचा का आहे लिंक करणे महत्वाचे

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कुठल्याही व्यक्तीला दिला जाणारा आधार क्रमांक हा युनिक म्हणजेच एकमेव असतो. हा नंबर दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला दिला जात नाही. थोडक्यात आधार क्रमांक हा संख्येच्या भाषेतील व्यक्तीची ओळख आहे.

दुसरीकडे आयकर विभागाने कुठल्याही आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक केले आहे. पॅन नंबर म्हणजे पर्मनंट अकाउंट नंबर, म्हणजेच कायमस्वरुपी खाते क्रमांक असतो. पन्नास हजारांहून अधिक रक्कमेच्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आता हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना जोडण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली आहे.

का करायचे आधार आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक ?

आयकर विभागाच्या कलम 139AA नुसार जर तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार क्रमांकाला जोडण्यात आले नसेल ते अवैध मानण्यात येते. या स्थितीत तुम्हाला अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागू शकतो. यामुळे कदाचित तुमाला ऑनलाईन ITR फाईल करणे त्रासदायक होईल. तुमचा आयकर परतावा अडकून बसेल. तुमच्या कुठल्याच आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. याच कारणामुळे गतवर्षी जवळपास ११.४० लाख लोकांचे पॅन कार्ड बंद पडले होते.

कसे करणार आधार आणि पॅन कार्ड लिंक ?

तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे एकदम सोपी गोष्ट आहे. त्यासाठी दोन मार्ग आहेत, ऑनलाईन आणि एसएमएस ! ऑनलाईन पद्धतीत सर्वप्रथम आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जा. तिथे Link Aadhar टॅबवर क्लिक करुन पुढे आपली सर्व माहिती आणि आधार क्रमांक भरा. त्यानंतर सिस्टीम तुमची माहिती व्हेरिफाय करुन तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड लिंक झाल्याचा मेसेज येईल.

दुसऱ्या प्रकारात आपल्या आधार कार्डला लिंक असणाऱ्या फोन नंबर वरुन UIDPN टाईप करुन पुढे आपला पॅन आणि आधार कार्ड लिहा आणि 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. तिथून आयकर विभाग आपले आधार आणि पॅन क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया सुरु करेल आणि प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तसा मेसेज येईल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *