शरद पवार नेमके किती मताने निवडून येणार हे तंतोतंत सांगणारा अवलिया..

शरद पवार देशातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुख्य चेहरा आहे. अनेक निवडणुका त्यांनी लढविल्या आणि जिंकल्या सुध्दा आहे. आणि याच निवडणुकीत काही अश्या गोष्टी घडतात ज्या अजरामर होतात. असाच एक किस्सा बारामतीच्या निवडणुकीतील आहे.

मुळात हा किस्साच अविश्वासातून घडला होता. या गोष्टीतील नायक ना. तु. ठणके (नामदेव तुकाराम ठणके) आहे. तर सुरवातीला बारामती मध्ये निवडून जाणे हे पवारासाठी हि साधेसोपे नव्हते कारण नीरा नदीकाठच्या बागायती पट्ट्यात प्रस्थापित काकडे घराण्याचे वर्चस्व हाेते. आणि पवार साहेब हे जिरायती भागाच्या जोरावर निवडून येत असे.

तर बारामतीमधील नामदेवराव ठणके शिर्सुफळ (ता. बारामती) येथील रहिवासी आहेत. हे पवारांचे पहिले पासून निष्ठावान आहेत परंतु निवडणुकीच्या वेळीस अशी अफवा पसरवली गेली कि ठणके हे विरोधी गटात गेले आहे या गोष्टीमुळे पवार साहेबांनी त्यांची भेट घेतली.

आता आपला विश्वास पवार साहेबाना कसा पटवून द्यायचा यासाठी त्यांनी एक नामी आयडिया लढवली. तर निवडणुकीच्या दिवशी ठणके आपल्या शर्ट मध्ये एक कागद घेऊन गेले आणि तेव्हा मतदान हे मतपत्रिकेवर होत असे. मतदान केल्यावर त्यांनी अधिकाऱ्याचे लक्ष नसताना हा कागदाचा तुकडा मतपत्रिकेच्या घडीत टाकून दिला.

आणि या मतपत्रिकेच्या आतील कागदावर लिहिले होते, शरद पवार बारामतीला नाही परका । राजकारण खेळतो श्रीकृष्णासारखा । पंचवीस ते अठ्ठावीस हजार मतांनी निवडून येणार बरं का। – ना. तु. ठणके (नामदेव तुकाराम ठणके)

मतमोजणी वेळेस हा कागद मतमोजणी कर्मचार्यांना मिळाला. आणि तो कागद त्यांनी शरद पवारांचे सहकारी धोंडिबा सातव यांच्याकडे दिला. निवडणुकीचा निकाल लागला ठणके यांनी विश्वास दर्शविला होता कि पवार २८ हजार मतांनी निवडून येणार आणि झालेही तसेच काही पवारांना त्यांनी दर्शविल्या अंदाजापेक्षा केवळ ५६ मते पवारांना अधिक होती.

शरद पवार हे २८ हजार ५६ मतांनी विजयी झाले होते आणि ठणके यांची भविष्यवाणी आणि त्यांच्या विषयी पसरवलेल्या अफवा त्यांनी खोडून काढल्या होत्या. यानंतर हा किस्सा संपूर्ण बारामती मध्ये पसरला आणि गुप्त मतदान निवडणूक प्रक्रियेचा त्यांनी भंग केला असे त्यांना सांगू लागले. काही जण म्हणाले, ‘तुम्ही गुप्त मतदान पध्दतीचा भंग केला आहे. तुमच्यावर कारवाई होईल.’ मात्र ते ऐकून ठणके शिर्सुफळ गावातून भूमिगत झाले.

त्यानंतर पवारांनी त्यांचा सत्कार करायला गावात आले परंतु ठणके भूमिगत असल्याने मिळाले नाही नंतर साहेब हे पुलोदचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यावरील कार्यवाही देखील टळली. आजही हा किस्सा निवडणुकीममध्ये सांगितल्या जातो.

सध्या नामदेवराव ठणके यांचे वय ८७ वर्ष आहे आणि ते शेती करतात. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *