जेवणात रोज एकच पदार्थ खाता तर सावधान ! वाचा नुकसान

आपला आहार आपले शरीर स्वास्थ ठरविण्यात मदत करते. आहारात आपण अनेकदा चुका करतो परंतु आपणास माहिती नाही कि आपण नेमक्या कोणत्या चूक करत आहो. आवडते म्हणून एकच पदार्थ रोज खाणे किंवा बाकी आवडत नाही म्हणून एकाच पदार्थावर जोर देणे हे अतिशय चुकीचे आहे.

उदाहरणार्थ रोज सकाळी तुम्ही नाश्ता करताना टोस्ट खाता आणि सायंकाळी दलिया जर असे असेल तर आपणास हि सवय लवकरात लवकर बदलावी लागेल कारण पुढील प्रमाणे आहेत.

पोषक तत्वांची कमी

शरीरास वेगवेगळे विटामिन म्हणजे पोषक द्रव्य लागतात. यामुळे शरीर व्यवस्थित काम करते. हि गरज वेगवेगळ्या भाज्यातून पूर्ण होते. रोज एकच भाजी खाल्याने आपल्या शरीरात संपूर्ण पोषक द्रव्य मिळणार नाही. आपल्या आहारात भाजीपाला आणि फळांचा समावेश करा.

आतड्या वर होतो परिणाम

रोज वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्याने आपल्या आतड्यामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या बक्टेरियाची वाढ होते. यामुळे आपली रोग प्रतिकार शक्तीची वाढ होते. जेवणात फर्मेंटेड पदार्थ, फळ आणि पालेभाज्यांचा समावेश करा.

वजन कमी करता येणार नाही वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधना नुसार रोजच एकच पदार्थ खाल्याने वजन कमी होण्याची प्रक्रिया संथ गतीने चालते. जे लोक वेगवेगळ्या पालेभाज्या खातात त्यांचे वजन जलद गतीने कमी होते.

अति प्रमाणात एकच पोषक द्रव्य मिळाल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात. उदाहरणार्थ हळद शरीरास चांगली आहे परंतु रोजच त्याचे सेवन केल्याने लिवर वर परिणाम होऊ शकतो.

रोज एकच पदार्थ खाल्याने ईटिंग डिसऑर्डर होऊ शकतो. यामुळे एखाद्या विशेष पदार्था विषयी मनात न खाण्याची भावना निर्माण होते. यामुळे कमी पोषक द्रव्य मिळतात.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *