सुषमा स्वराज यांच्या मुलीने पूर्ण केली त्यांची ‘शेवटची इच्छा’

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं होतं. सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यानंतर जाहीर केला होता.

निधनापूर्वी त्यांची एक इच्छा व्यक्त केली होती जी अपूर्ण राहिली होती. त्यांची हीच अंतिम इच्छा त्यांच्या मुलीने पूर्ण केली आहे. सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्यासाठी लढणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांना फोन केला होता.

साळवेंना त्यांनी एक रुपया घेऊन जाण्यासाठी घरी बोलाविले होते. साळवे यांनी एक रुपया फीस घेऊन कुलभूषण जाधव खटल्याच्या सुनावणीदरम्यान भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी झाल्यानंतर हरीश साळवे यांना त्यांची फी घेऊन जाण्यासाठी बोलविले होते. मात्र, यानंतर सुषमा स्वराज यांचे निधन झाले. सुषमा स्वराज यांनी ही अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे.

बांसुरी यांनी शुक्रवारी हरीश साळवे यांची भेट घेऊन त्यांची फी दिली आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी स्वराज कौशल यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “बांसुरीने आज तुझी अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. कुलभूषण जाधव खटल्याची एक रुपया फी, जी तू सोडून गेली होती, ती तिने हरीश साळवे यांची भेट घेऊन दिली आहे.”

सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना हरीश साळवे यांनी सांगितले होते की, “निधनाच्या जवळपास एक तास आधी मी सुषमा स्वराज यांच्याशी बोललो होतो. रात्री 8.50 वाजता आमची बातचीत झाली. तो अतिशय भावनिक संवाद होता. त्या म्हणाल्या की, या आणि मला भेटा. जो खटला तुम्ही जिंकला, त्यासाठी तुम्हाला तुमचा एक रुपया द्यायचा आहे. मी म्हणालो, नक्कीच, मला ती मौल्यवान फी घेण्यासाठी यायचंच आहे. मग त्या म्हणाल्या की उद्या सहा वाजता या.”

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *