केबीसी मधून फक्त दहा हजार घेऊन परतली अमिताभची बहिण, समजू शकली नाही अमिताभचा इशारा

कौन‌ बनेगा करोड़पति (Kaun Banega Crorepati Season 11) ची चर्चा सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होत आहे कारण खिचडी शिजवनार्या बबिता ताडे यांनी १ करोड रुपये जिंकले. याच कार्यक्रमात २७ डिसेम्बर रोजी झालेल्या प्रक्षेपणात ७ करोड जिंकायचा दावा करणारी शिक्षिका फक्त १० हजार घेऊन परत गेल्या.

सांगली येथील जाहिरा रियाज हुंडेकर यांचे नाव आहे. त्यांनी खेळायच्या सुरवातीला दमदार प्रदर्शन करत खेळ सुरु केला. आणि सर्व प्रश्नाचे उत्तर देत धडाधड उत्तर देत त्या १ लाख ६० हजार रुपये जिंकल्या. या दरम्यान त्यांनी फक्त एका लाईफलाईनचा उपयोग केला आणि ३.२० लाख रुपयाच्या प्रश्नावर त्या हरल्या आणि फक्त १० हजार रुपये घेऊन परत गेल्या.

अश्या बनल्या अमिताभ यांच्या बहिण

कौन बनेगा करोडपतीचा हा खेळ सुरु असताना त्यांनी एक खुलासा केला कि, प्रत्येक रक्षा बंधनला जाहीरा त्यांना राखी पाठवत असे. याचा पुरावा म्हणून त्यांनी त्यांना परत पाठविलेले अमिताभ यांचे पत्र देखील आणले होते. शो सुरु असताना त्यांनी हे पत्र दाखविले देखील.

या पत्रात अमिताभ यांनी आपला आगामी चित्रपट शहंशाहचा उल्लेख देखील केलेला आहे. बीकॉम शिकलेल्या जाहीरा वर्ग तिसऱ्याच्या प्रश्नावर अडकल्या होत्या. त्यांनी गणिताच्या संबंधित प्रश्नांचे उत्तर अगदी जलद दिले होते. परंतु अमिताभ यांनी दिलेला एक इशारा त्या समजू शकल्या नाही.

“महाकाव्य पृथ्वीराज रासो में पृथ्वीराज चौहान और मुख्य रूप से इनमें से किसके बीच हुए युद्ध का वर्णन मिलता है?” हा प्रश्न त्यांना ३.२० लक्ष रुपयासाठी विचारण्यात आला होता. याचे उत्तर देण्या करिता त्यांनी सांगितले कि, ” C हे उत्तर वाटत आहे सर ?” यावर अमिताभ यांनी त्यांना मध्ये थांबवून सांगितले कि प्रत्येक वेळेस लग रहा है असे न म्हणता आपण क्लियर उत्तर द्या.

हे ऐकून सुध्दा त्यांनी चुकीचा विकल्प महमूद गजनवी हा निवडला. योग्य उत्तर मुहम्मद गौरी हे होते. यानंतर अमिताभ यांनी निराशा दर्शवली परंतु बुद्धिमत्ता व नशिबाचा हा खेळ आहे त्या जिंकू शकल्या नाही.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *