KBC मध्ये स्वाक्षरी करताना ‘यामुळे’ थरथरतात अमिताभ बच्चन यांचे हात!

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती हा शो एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. सध्या कौन बनेगा करोडपतीचे ११ वे सीजन चालू आहे. UK मधील प्रसिद्ध “Who Wants To Be Millionaire” शो वरून प्रेरणा घेऊन हा शो भारतात चालू करण्यात आला. KBC मध्ये पहिल्या २ पर्वात अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केले तर तिसऱ्या पर्वात शाहरुख खानने शो होस्ट केला.

KBC ची सुरुवात २००० साली झाली. चौथ्या पर्वापासून पुन्हा अमिताभ बच्चन यांच्याकडे KBC चे सूत्र आले. सध्या सुरु असलेल्या ११ व्या पर्वात लोकप्रियता शिगेला पोहचली आहे. KBC चे अनेक किस्से आजपर्यंत व्हायरल झालेले आहेत. पण काल झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी एक धक्कादायक माहिती सांगितली त्यानंतर चाहत्यांना धक्का बसला.

काल प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी आपल्या प्रकृतीविषयक खुलासा केला आहे. गुरुवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये ६६ वर्षीय स्पर्धक अनिल जोशी यांच्याशी बोलताना अमिताभ बच्चन यांनी अनेकदा मेमरी लॉस होत असल्याचे सांगितले.

यावेळी अमिताभ बच्चन यांनी सांगितलं कि, ‘अनेकदा मी रूममध्ये गेल्यावर मी नेमकं कशासाठी गेलो हेच विसरून जातो. मग पुन्हा रूमबाहेर जातो आणि माझी पत्नी किंवा घरातील इतर सदस्यांना मी रूममध्ये का गेलो होतो, असा प्रश्न करतो. अर्थातच त्यांच्याकडे याचे उत्तर नसते,’ असे त्यांनी सांगितले.

‘अनेकदा माझ्या हाताची बोट नीट काम करत नाहीत. माझा हात सतत थरथरत असतो. अनेकदा सही करत असताना माझे हात थरथरतात आणि मला सही करणेही कठीण जाते,’ असेही त्यांनी सांगितले.

अमिताभ यांच्या मांसपेशी तुटल्यामुळे त्यांचा एक हाथ व्यवस्थित काम करत नाही. त्यांना हाथ नीट उचलता देखील येत नाही. याशिवाय अमिताभ यांनी एका एपिसोडमध्ये त्यांना हेपेटायटिस आणि टीबी या आजाराने ग्रासल्याचे सांगितले होते.अमिताभ यांना कुली सिनेमाच्या वेळी दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांना २०० लोकांनी रक्त दिले होते ज्यातून त्यांना ‘हेपेटायटिस बी’ ची लागण झाली होती. याचमुळे त्यांचे ७५% रक्त देखील खराब झाले आहे.

याशिवाय अमिताभ यांना टीबीचीही लागण झाली होती. ‘हेपेटायटिस बी’ बद्दल अमिताभ यांना ४ वर्षानंतर कळले होते तोपर्यंत त्यांना टीबी झाला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *