इन्कलाब श्रीवास्तव होते अमिताभ यांचे खरे नाव! बघा कसे बनले अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे. गेल्या ५० वर्षांत २२६ हुन अधिक चित्रपट, टीव्ही शोजच्या माध्यमातून हे नाव आपल्या घरोघरी पोहोचले आहे. अँग्री यंग मॅन अशी अमिताभची ओळख आहे. १९७५ ते १९८८ या तेरा वर्षांच्या काळात तर अमिताभच्या नुसत्या नावानेच चित्रपट चालत होते, इतकी त्याची लोकप्रियता होती.

किरकोळ शरीरयष्टी आणि आकर्षक चेहरा नसले तरी आपल्या अभिनय कौशल्य, आवाज, संवादफेक आणि डायलॉगच्या बळावर चित्रपट क्षेत्रात सुपरस्टार होता येते हे अमिताभ बच्चनने दाखवून दिले. पण हा अमिताभ बच्चन कसा झाला याची कहाणी तुम्हाला माहित आहे का ?

अमिताभ कसा बनला बच्चन ?

अमिताभ बच्चन यांचे मूळ नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. त्यांचे वडील हरिवंशराय हे कवी होते. ते बच्चन या टोपण नावाने कविता करायचे. हरिवंशराय यांनी आपल्या कवी मित्र सुमित्रानंदन पंत यांच्या सल्ल्यावरून इन्कलाब हे नाव बदलून अमिताभ नाव ठेवण्याचा सल्ला दिला. त्यावरून हरिवंशराय यांनी मुलाचे नाव बदलून अमिताभ असे ठेवले.

अमिताभ याचा अर्थ कधीही न संपणारा प्रकाश ! हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना अमिताभने आपले मूळचे श्रीवास्तव आडनाव लावण्याऐवजी आपल्या वडिलांचे टोपण नाव बच्चन हेच आडनाव म्हणून लावले. पुढे संपूर्ण परिवाराला बच्चन हेच नाव रूढ झाले.

बच्चन आडनाव अमिताभची असे ठरले लकी

इन्कलाब श्रीवास्तव ऐवजी अमिताभ बच्चन या नावाचा अमिताभला फायदा झाला. अभिनेता, निर्माता, गायक आणि टीव्ही शोचा निवेदक म्हणून अमिताभला प्रचंड संधी मिळाली.

त्याच्या अभिनयाबद्दल त्याला चार वेळा बेस्ट ऍक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर ४१ वेळा नामांकन होऊन पंधरा वेळा फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला. १९८४ मध्ये पदमश्री, २००१ मध्ये पद्मभूषण, २०१५ मध्ये पद्मविभूषण आणि आता २०१९ मध्ये दादासाहेब फाळके सन्मान पुरस्काराने अमिताभचा गौरव झाला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *