मिनरल वॉटर आणि बॉटलबंद पाण्यात काय फरक असतो ?

सर्वसामान्य भाषेत पाणी म्हणजे जीवन ! रसायनशास्त्राच्या भाषेत हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू एकत्र आल्यानंतर पाण्याचा एक रेणू तयार होतो. भौतिकशास्त्राच्या भाषेत पाण्याच्या स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्था समजल्या जातात.

दैनंदिन भाषेत सर्वसामान्यपणे द्रव अवस्थेला आपण पाणी, स्थायू अवस्थेला बर्फ आणि वायू अवस्थेला वाफ म्हणतो. पाणी, बर्फ आणि वाफ वेगवेगळ्या ठिकाणी माणूस वापरत असतो. पण आज आपला विषय आहे तो म्हणजे मिनरल वॉटर आणि बॉटलबंद पाण्यात फरक काय ? पाहूया तर मग काय असतो फरक…

मिनरल वॉटर म्हणजे काय ?

मिनरल वॉटर म्हणजे ज्या पाण्यात मिनरल्स आहेत असे पाणी, म्हणजेच खनिज असणारे पाणी ! ही खनिजे नैसर्गिकरित्या पाण्यात उपलब्ध असतात किंवा कृत्रिमरीत्या पाण्यात मिसळली जाऊ शकतात. झरे, सरोवर, नद्या किंवा विहीर अशा पाण्याच्या प्रारंभीच्या स्रोतांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्यात खनिजे असू शकतात. इतर ठिकाणच्या पाण्यात आवश्यक ती पोषकद्रव्ये घालून कृत्रिमरीत्या मिनरल वॉटर मिळवता येते. मिनरल्स हे पोषकद्रव्यांचा चांगला स्रोत असतात. मिनरल वॉटरच्या वापरामुळे शरीराला अतिरिक्त पोषक घटक मिळू शकतात.

बॉटलबंद पाणी म्हणजे काय ?

बॉटलबंद पाणी हे पॅकेजड केलेले सीलबंद पाणी असते, जे माणसांना प्यायला वापरण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि पिण्यायोग्य बनवण्यात आलेले असते. जरी हे पाणी स्वच्छ आणि सुरक्षित असले तरी ते बनवण्यासाठी अनेक केमिकल्स वापरलेले असतात.

त्यामुळे मिनरल वॉटरच्या तुलनेत ते कमी आरोग्यदायी असते. अशा पाण्यामध्ये मिनरल्सचे प्रमाण कमी असते किंवा जे असतात ते कृत्रिमरीत्या मिसळलेले असतात. अनेकदा बॉटलबंद पाण्यालाच मिनरल वॉटर म्हणून लोक फसवले जातात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *