पोलिसांची वर्दी खाकी रंगाची का असते माहिती आहे का?

प्रत्येक देशात कायदा व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी पोलिस दलाची स्थापना केली जाते. पोलिसांमुळेच आपण सर्वजण निर्धास्तपणे झोपू शकतो. दिवस असो, रात्र असो किंवा कोणताही उत्सव असो, पोलीस आपल्या संरक्षणासाठी नेहमीच तैनात असतात.

आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे ते महत्त्वाचे अंग आहेत. लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे, गुन्ह्यांना आळा घालणे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपीला पुराव्यानिशी न्यायालयासमोर हजर करणे, इत्यादि जबाबदारी पोलिसांवर असते.

समाजात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही अधिकार असतात. सर्वसाधारपणे या पोलिसांना आपण त्यांच्या खाकी गणवेशावरुन ओळखतो. खाकी गणवेश ही पोलिसांची प्रमुख ओळख आहे.

फरक इतकाच की काही राज्यात तो गणवेश किंचित फिकट तर काही राज्यात गडद खाकी रंगाचा असतो. परंतु पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकीच का असतो याचा आपण कधी विचार केला आहे का ? चला तर मग आज जाणून घेऊया…

पांढऱ्या रंगाच्या गणवेशामुळे पोलीस झाले होते त्रस्त

भारतात इंग्रजांचे शासन अस्तांच्या काळात पोलिसांचा गणवेश पांढऱ्या रंगाचा होता. परंतु दीर्घकाळ ड्युटी असल्यामुळे तो गणवेश लवकर मळत असे. या कारणाने त्रस्त होऊन पोलिसांनी आपल्या गणवेशाला वेगवेगळ्या रंगात रंगायला सुरुवात केली.

परंतु यामुळे पोलीस वेगवेगळ्या गणवेशात दिसायला लागले. शेवटी वैतागून पोलिसांनी खाकी रंगाची डाय तयार केली. त्यासाठी चहाच्या पानांचे पाणी किंवा कॉटन फॅब्रिकचा रंग डाई म्हणून वापरला, ज्यामुळे त्यांच्या गणवेशाचा रंग खाकी झाला.

खाक या शब्दाचा हिंदी अर्थ गाढ मातीचा रंग असा आहे. या खाकी रंगामुळे पोलिसांच्या वर्दीवर धूळ, डाग कमी दिसतील. सर हॅरी लुम्सडन यांनी १८४७ मध्ये सर्वप्रथम खाकी रंगाचा गणवेश अधिकृत म्हणून स्वीकारला आणि तेव्हापासून खाकी रंगाचा गणवेश भारतीय पोलिसात कार्यरत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *