विवाहित महिलांनी या ७ गोष्टी कुणालाही द्यायच्या नसतात

हिंदू धर्मात सौभाग्यवती महिलांना देवी समान मानले जाते आणि तिच्या सौभाग्याच्या साहित्याला देवीचा आशीर्वाद मानले जातात. त्यामुळेच कुठल्याही विवाहितेने तिच्या सौभाग्याच्या वस्तू जपून ठेवणे फार महत्वाचे असते. परंतु बर्‍याच वेळा समजत असून सुद्धा महिला त्याकडे नकळत दुर्लक्ष करतात.

आपल्या सौभाग्याचा वस्तू त्या इतर महिलांना वाटतात. मात्र यामुळे त्या महिलेच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होऊ शकतो. धार्मिकदृष्ट्या देखील असे करणे योग्य नाही. पाहूया कोणकोणत्या आहेत त्या ७ गोष्टी…

१) कुंकू : हिंदू शास्त्रानुसार विवाहित स्त्रीसाठी कुंकू ही सर्वात मोठी ओळख असते, म्हणून सर्व सौभाग्यवती महिलांनी त्याचा आदर केला पाहिजे. ते कुणासोबतही वाटू नये. तसेच कुणासमोर कुंकू लावू नये. आंघोळ केल्यावर डोक्यावर पदर असतानाच कुंकू लावावा.

२) लग्नाचा पोशाख : बऱ्याचदा विवाहित महिला आपला लग्नाचा पोशाख किंवा हळदीचा पोशाख ते कुटुंबातील किंवा नात्यातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला घालायला देतात. परंतु असे करण्याने तुमचे सौभाग्य हिरावून घेतले जाते असे मानतात.

३) काजळ : काजळ डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच नजर लागण्यापासून वाचवते. विवाहित महिलांनी त्यांचे काजळ इतर महिलांमध्ये वाटल्यास पती-पत्नीमधील प्रेम कमी होते असे मानले जाते. तसेच डोळ्यांचे संक्रमक आजारही होत नाहीत.

४) टिकली : विवाहित महिलेने आपल्या कपाळावरील टिकली काढून इतर महिलांना देऊ नये, त्यामुळे आपल्या पतीचे आपल्यावरील प्रेम वाटले जाते असे मानतात. जर टिकली द्यावीच लागत असेल तर ती अगोदर कुठल्यातरी झाडाच्या पानाला चिकटवावी, मगच द्यावी.

५) मेहंदी : विवाहितेच्या हातावर मेहंदी जितकी जास्त रंगते, तितके तिला पतीचे जास्त प्रेम मिळते असे मानतात. त्यामुळे विवाहितेने आपल्या हातांना लावलेली मेहंदी दुसऱ्या विवाहित महिलेला देऊ नये.

६) बांगड्या : लग्नानंतर महिलेच्या शृंगारात बांगड्याची भर पडते. आपल्या ड्रेस किंवा साडीला मॅचिंग वस्तू घालण्याच्या मोहात स्त्रिया आपल्या बांगड्या इतर महिलांना घालायला देतात, परंतु असे करणे अशुभ मानले जाते.

७) जोडवी : अनेकदा महिला त्यांच्या लग्नातील जोडव्या आपल्या बहिणीला, मैत्रिणीला किंवा इतर महिलांना देतात. परंतु शास्त्रानुसार हे अयोग्य आहे, त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात असे मानले जाते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *