कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद कपूरची फी वाढली, आता घेणार तब्बल ‘एवढे कोटी’

शुक्रवार हा नवीन चित्रपट रिलीज व्हायचा वार ! पण कबीर सिंग चित्रपट रिलीज झाल्यांनतर अनेक शुक्रवार उलटून गेले, तरी कबीर सिंगची जादू काय कमी झाली नाही. साऊथच्या अर्जुन रेड्डी चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर २७८ कोटींचा गल्ला जमवला आहे.

कबीर सिंग चित्रपटातील गाण्यांनीही तरुणाईला भुरळ घातली. कधी प्रेयसीला मारहाण करताना, तर कधी तिच्यावर आपलाच हक्क असल्याचे सांगून तिला आपल्या मनाप्रमाणे वागवणाऱ्या दारुड्या डॉक्टरची भूमिका शाहिद कपूरने उत्तमपणे साकारली आहे.

कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद कपूरची मागणी वाढली

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळख असणाऱ्या शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ लूक चित्रपटाइतकाच प्रसिद्ध झाला. जिकडेतिकडे दाढी आणि केस वाढवलेले, एकाचवेळी दोन सिगारेट ओढणारे कबीर सिंग बघायला मिळत आहेत.

काही म्हणा, शाहिद कपूर ही आजच्या तरुणाईची मागणी बनली. कबीर सिंग हा यंदाचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरल्याने आपोआप शाहिद कपूरला भाव आला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या यशानंतर शाहिदने लगेचच आपली फी वाढविली असल्याची चर्चा आहे.

शाहिद त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी किती कोटी मानधन घेणार ?

कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद कपूर अद्याप आपला पुढचा चित्रपट जाहीर केला नसला तरी तेलुगू अभिनेता नानी याचा सुपरहिट तेलगू चित्रपट जर्सीच्या हिंदी रिमेकसाठी शाहिदने आपली संमती दिल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाची निर्मिती अमन गिल, अल्लू अर्जुन आणि दिल राजू हे करत आहेत.

या चित्रपटासाठी शाहिदने केवळ मोठी फी मागितली नाही, तर चित्रपटाच्या नफ्यात वाटाही मागितल्याची चर्चा आहे. असे सांगितले जात आहे की त्याने फी म्हणून ३५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्याबरोबरच चित्रपटाच्या नफ्यात २० टक्के हिस्साही मागितला आहेयावर्षी नोव्हेंबरमध्ये शाहिद या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *